Navratri 2024 Travel : कोलकाता डॉक्टरवरील अमानुष बलात्कार प्रकरण, बदलापूर चिमुरडीवरील विनयभंग अशा एकामागोमाग एक महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे, गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घटनेमुळे या जगात एक अधर्मच माजला आहे, त्यामुळे देवीने महिषासूरमर्दिनीचा अवतार घेऊन अशा राक्षसांचा संहार करण्यात यावा अशी मागणी भक्तांकडून देवीकडे करण्यात येत आहे. अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला...महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला.. अशावेळी आई भवानी तुझ्या कृपेने... या मराठी गाण्याचे बोल आठवतात. यातून जणू देवीची विनवणीच करण्यात येत आहे. सधा देशभरात 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीचा सण सुरू झाला आहे, हा उत्सव 12 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.


 


नवरात्रीमध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी


धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीमध्ये देवीचे दर्शन घेणे हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये अनेक लोक देवी दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. देशात अनेक प्रसिद्ध आणि पवित्र दुर्गा मंदिरं आहेत, जिथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रात सध्या असलेले वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर हे देखील असेच एक दुर्गा मंदिर आहे, ज्याबद्दल असे म्हटले जाते की, जो कोणी नवरात्रीच्या काळात खऱ्या मनाने येथे पोहोचतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.




 


वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर कोठे आहे?



  • वज्रेश्वरी देवीची खासियत सांगण्यापूर्वी, हे पवित्र आणि प्रसिद्ध मंदिर महाराष्ट्रातील वज्रेश्वरी येथे आहे.

  • वज्रेश्वरी शहर मुंबईपासून सुमारे 75 किमी अंतरावर आहे.

  • मुंबई व्यतिरिक्त वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर ठाण्यापासून सुमारे 43 किमी,

  • वसईपासून सुमारे 26 किमी आणि कल्याणपासून सुमारे 43 किमी अंतरावर आहे.

  • मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही तितकाच प्रसिद्ध आहे.


 


देवीच्या मंदिराचा इतिहास खूप जुना, अनेक पुराणकथा प्रचलित


वज्रेश्वरी देवी मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. देवी दुर्गाला समर्पित वज्रेश्वरी देवी मंदिराच्या इतिहासाबाबत अनेक पुराणकथा आहेत. होय, या मंदिराचा इतिहास महाराष्ट्र साम्राज्यापासून पोर्तुगीजांशी जोडलेला आहे. वज्रेश्वरी देवीचे मंदिर चिमाजी आप्पा पेशवे यांनी बांधल्याचे सांगितले जाते. काही लोकांचा असा विश्वास आहे की हे मंदिर पोर्तुगीजांनी नष्ट केले होते, परंतु नंतर जेव्हा चिमाजी आप्पा पेशवे यांनी वसई किल्ला जिंकला तेव्हा हे मंदिर बांधले गेले. या मंदिराने मराठा साम्राज्याचा इतिहास जवळून पाहिला असल्याचे सांगितले जाते.




वज्रातून प्रकट होऊन अनेक राक्षसांचा नाश


वज्रेश्वरी देवी मंदिराची पौराणिक कथा खूप मनोरंजक आहे. या देवीने वज्रातून प्रकट होऊन अनेक राक्षसांचा नाश केल्याचे सांगितले जाते. श्रद्धेनुसार येथे जो कोणी खऱ्या मनाने दर्शनासाठी येतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. वज्रेश्वरी देवीसोबतच रेणुका माता, कालिका माता आणि महालक्ष्मी माता यांच्या मूर्तीही येथे आहेत. वज्रेश्वरी देवी मंडईच्या प्रांगणात एक गरम तळे आहे, या तलावाबद्दल असे म्हटले जाते की त्यामध्ये स्नान केल्याने सर्व दुःख दूर होतात. विशेषत: नवरात्रीच्या काळात स्नान करूनही अनेकजण मातेचे दर्शन घेण्यासाठी येतात.


नवरात्रीत मोठी गर्दी


नवरात्रीच्या काळात या मंदिराचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. मुख्य मंदिरात जाण्यासाठी सुमारे 52 पायऱ्या चढून जावे लागते आणि नवरात्रीच्या काळात या पायऱ्या हजारो प्रकारच्या फुलांनी सजवल्या जातात. संपूर्ण नऊ दिवस मंदिराच्या पायऱ्यांपासून मंदिराच्या प्रांगणापर्यंत सर्व काही दिव्यांनी सजवले जाते. नवरात्रीच्या पवित्र दिवसात दररोज हजारो भाविक येथे येतात. संध्याकाळच्या आरतीच्या वेळी परिसरात सर्वाधिक गर्दी असते.


 


वज्रेश्वरी देवी मंदिरात कसे जायचे?


वज्रेश्वरी देवी मंदिरात जाणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातून बस किंवा ट्रेनने मुंबईला पोहोचू शकता. वसईला पोहोचल्यानंतर, तुम्ही वज्रेश्वरी देवी मंदिरापर्यंत जाण्यासाठी स्थानिक टॅक्सी घेऊ शकता, ठाणे शहरातूनही वज्रेश्वरी मंदिरात जाता येते.


 


हेही वाचा>>>


Navratri 2024 Travel: जिथे सुयोग्य जोडीदाराचा मिळतो आशीर्वाद, मनोकामना होतात पूर्ण, देवी ब्रह्मचारिणीचे अनोखे मंदिर, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भेट द्या.. 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )