Bopdev Ghat Incident: तरुणाला बांधून ठेवलं, 21 वर्षीय तरुणीवर तिघांकडून अत्याचार, बोपदेव घाटातील हादरवणारा घटनाक्रम पोलिसांनी सांगितला!

Police Information on Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटात मित्रासोबत गेलेल्या तरूणीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे, या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी याबाबतचा घटनाक्रम सांगितला आहे.

Continues below advertisement

पुणे: पुण्यात मित्रासोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत आधी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांनी या प्रकरणी राजेखां करीम पठाण याच्यांसह तिघांना अटक केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर आता संताप व्यक्त केला जात आहे, काल (गुरूवारी) पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर संतप्त जमाव एकत्रित आला होता, त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत संतापजनक पोस्ट आपल्या सोशल मिडिया शेअर केली आहे, त्यानंतर आता या घटनेबाबत पोलिसांनी संपूर्ण माहिती दिली आहे. 

Continues below advertisement

पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी

पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, काल (गुरूवारी) रात्री 21 वर्षीय मुलगी आपल्या मित्रासोबत पुण्याजवळील बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. रात्री 11च्या सुमारास ते तिथे गेले होते. 3 लोकांनी मुलांना मारहाण करत अतिप्रसंग केला आहे. या घटनेची माहिती आपल्याला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मिळाली. या प्रकरणात एकुण 10 पथकं कामाला लावली आहेत. अनेक लोकांची चौकशी सुरु आहे. एकुण 3 मुलं आहेत त्यांचा शोध सुरु आहे. मुलगी बाहेर राज्यातील आहे. बोपदेव घाटात नेहमी लोक वॉकिंगला जातात. यावेळी ही घटना समोर आली, मारहाण करत मित्राला त्याठिकाणी बाधून ठेवलं होतं. मुलगी गंभीर जखमी आहे, तिच्यावरती देखील उपचार सुरु आहेत. आरोपी पुर्णपणे निष्पन्न झालेले नाहीत. पिडीत मुलगी 21 वर्षाची आहे. दोघेही कॉलेजमध्ये शिक्षण घेतं आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

सुप्रिया सुळेंची संतापजनक पोस्ट

या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संतापजनक पोस्ट लिहली आहे.  सोशल मिडिया एक्सवरती सुळेंनी पोस्ट लिहून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल उपस्थित केले आहेत. पोस्टमध्ये, "अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी", अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Pune Crime News)

 

Supriya Sule: अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola