Navratri 2024: आजकाल देवाची भक्ती करणे सर्वांनाच आवडेल असं नाही, परंतु ज्यांना खरंच देवाच्या कृपेचा आशीर्वाद हवा आहे, असे पुष्कळ लोक देवाची भक्ती करतात आणि बरेच लोक स्वतःला देवाचे महान भक्त म्हणून संबोधतात, पण खरी देवाची आपल्यावर किती भक्ती किती आहे? याची योग्य माहिती लोकांना नाही? भक्तांनी देवाची उपासना करताना कोणत्या प्रकारची भक्ती ठेवली पाहिजे? याचे ज्ञान लोकांना नसते. यामध्ये भगवंताची पूजा करताना भक्ताच्या मनात कोणत्या भावना ठेवाव्यात हे समजत नाही. भाविक अनेक प्रश्नांसह प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) यांच्याकडे संपर्क साधतात, ज्यांचे महाराज अतिशय सोप्या पद्धतीने उत्तर देतात. आज तुम्हाला प्रेमानंद महाराजांच्या मते भक्ताच्या मनात नेहमी कोणत्या प्रकारच्या भावना असायला हव्यात? हे सांगितले आहे.


 


महाराजांना विचारण्यात आला भक्ताकडून 'हा' प्रश्न 


भक्तांना अशा संत-महात्मांचा सहवास हवा असतो, जे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील, ज्यांची उत्तरे शोधणे त्यांना शक्य नाही. जेव्हा जेव्हा अनेक भक्त प्रेमानंदजी महाराजांना भेटतात, तेव्हा त्यांना त्यांच्या मनात चाललेल्या या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतात आणि महाराजही त्यांच्या प्रवचनात भक्तांचे प्रश्न ऐकतात आणि भक्तांच्या प्रश्नांची उत्तरेही देतात. त्यांच्या एका प्रवचनाच्या वेळी एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारले की, जेव्हा एखादा भक्त देवाची उपासना करतो तेव्हा त्याच्या मनात कोणती भक्ती असायला हवी आणि देवाची उपासना करताना भक्ताच्या मनात कोणती भावना असावी?


 


'अशी' असावी भक्ताची निष्ठा, प्रेमानंद महाराज म्हणतात... 


प्रेमानंदजी महाराजांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, भक्त जेव्हा जेव्हा देवाची पूजा करतात, तेव्हा त्यांच्या मनात ही भावना ठेवावी की हे परमेश्वरा, तुमचे अनेक भक्त आहेत आणि अनेक लोक तुम्हाला रात्रंदिवस हाक मारतात, मी देखील त्यापैकी एक आहे. तुझी इच्छा असेल तर तू माझ्याकडे दुर्लक्ष करू शकतोस, पण मी सदैव तुझे नामस्मरण करीन, मी फक्त तुझाच आहे, हा माझा तुला शब्द आहे"


 


''देवाला भक्त खूप प्रिय आहेत''


आपल्या प्रवचनात महाराजांनी सांगितले की, भक्त अनेकदा त्यांच्या आनंदात आणि व्यस्त जीवनात भगवंताचे स्मरण विसरतात, परंतु देव आपल्या भक्तांवर खूप प्रेम करतो, तो आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाही.


 


हेही वाचा>>>


'माझा मुलगा एका विवाहित महिलेसोबत राहतोय, लिव्ह इन रिलेशनशिपबाबत प्रेमानंद महाराजांनी भक्ताला सांगितली 'अंदर की बात!'


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )