Navratri 2023 : आजपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरुवात झाली आहे. या काळात सात्विक अन्नाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. खरंतर, या अन्नामध्ये फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, संपूर्ण धान्य यांचा समावेश होतो. त्यात तळलेले किंवा मसालेदार अन्नाचं सेवन केलं जात नाही. सात्विक अन्न खाल्ल्याने मन शुद्ध, स्वच्छ आणि ऊर्जेने परिपूर्ण होते. या आहाराचे पालन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते असं म्हटलं जातं. 


सात्विक अन्नामध्ये विशेषतः कच्च्या भाज्या आणि फळांचा समावेश होतो. यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. हा आहार नियमितपणे पाळल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक गंभीर आजारांपासून दूर राहता येते. चला तर मग जाणून घेऊयात सात्विक अन्नाचे फायदे.


रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते


नवरात्रीमध्ये सात्विक अन्नाचं सेवन केल्याने अनेक आरोग्यासाठी फायदे होतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यासाठी नवरात्रीच्या उपवासात प्रथिनेयुक्त शेंगा आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. जे संसर्गाशी लढण्यास मदत करते. याशिवाय फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात, जे नैसर्गिकरित्या शरीराचे संरक्षण करतात.


वजन कमी करण्यास उपयुक्त


सात्विक अन्नामध्ये लोक अधिक हंगामी फळे आणि भाज्यांचं सेवन करतात. यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते आणि कॅलरीजही कमी आढळतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सात्विक अन्न तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये कमी कॅलरी असलेले पदार्थ तुम्हाला मदत करू शकतात. तसेच, सात्विक अन्नात भरपूर फायबर असते, जे खाल्ल्याने तुमचे बराच वेळ पोट भरलेले राहते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.


शरीराला ऊर्जा मिळते


जर तुम्ही नियमितपणे सात्विक अन्नाचं सेवन केलं तर तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. सात्विक आहाराचे नियम पाळल्यास थकवा दूर होतो.


शरीर डिटॉक्स करते


सात्विक अन्नाचं सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते. याच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारच्या समस्या टाळू शकता. जर तुम्हाला सूज येणे, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ येणे, थकवा येणे इत्यादी समस्या असतील तर सात्विक अन्नाचं नक्की सेवन करा. शरीर डिटॉक्स करण्यासाठी रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि मध मिसळून प्या. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Skin Care Tips : ग्रीन टी केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर; घरच्या घरी बनवा 'हे' 3 फेस पॅक, काही दिवसांतच फरक जाणवेल