Navratri 2020 Ghatasthapana Muhurat : आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. नवरात्रीचं पावन पर्व दुर्गामातेसाठी समर्पित आहे. देवी दुर्गेला शक्ती आणि उर्जेचं प्रतिक मानलं जातं. नवरात्रीत दुर्गेच्या सर्व नऊ रुपांची विधिवत पूजा अर्चा केली जाते. असं मानलं जात की, नवरात्रीच्या पावन पर्वात देवी दुर्गेची पुजा करून घटस्थापना केल्याने मनातील सर्व इच्छा आकांशा पूर्ण होतात.


नवरात्रीच्या पुजेमध्ये नियमांचं विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. माता दुर्गा नियम आणि कडक शिस्तीसाठी ओळखलं जाणारं देवीचं रुप आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच, घटस्थापनेच्या दिवशी देवीची विधिवत पुजा करणं महत्त्वाचं ठरतं. नवरात्रीच्या पावन पर्वाच्या पहिला दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. असं म्हटलं जातं की, पहिल्या दिवशीची पुजा विधिवत केल्याने देवीचा आशिर्वाद मिळतो. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच, घटस्थापना करण्यासाठीच्या सर्व विधी आणि नियम जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.


घटस्ठापनेचा शुभ मुहूर्त


नवरात्रीच्या पावन पर्वाला आजपासून, म्हणजेच 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या दिवशी घटस्ठापना केली जाते. पंचागानुसार, शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घट स्थापन केले जातात आणि नवरात्राला आरंभ होतो. 17 ऑक्टोबर 2020, शनिवारी सकाळी 06 वाजून 27 मिनिटं ते 10 वाजून 13 मिनिटांपर्यंत घटस्थापन करण्याचा मुहूर्त आहे. देशभरात नवरात्राची धूम असते. शारदीय नवरात्रोत्सवाचे देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळं महत्त्वा आहे. तसेच नवरात्रोत्सव साजरा करण्याची पद्धतही वेगळी आहे.


दरम्यान, नवरात्रोत्सवात अनेक भाविक देवीचा जागर करण्यासाठी उपवास देखील करतात. काही जण घटस्थापानेपासून पुढील नऊ दिवस उपवास करतात. यामध्ये काहींचा निर्जळी उपवास असतो, तर काही जण केवळ घट उठता बसता म्हणजे अश्विन शुक्ल प्रतिपदा आणि अष्टमी, नवमी याच दिवशी उपवास करतात आणि दसर्‍याच्या दिवशी हे उपवास सोडले जातात.