National Doctor's Day 2024 Wishes : राष्ट्रीय डॉक्टर्स दिन दरवर्षी 1 जुलै रोजी हा डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. देशातील सर्वात प्रसिद्ध डॉक्टरांपैकी एक, डॉ. बिधान चंद्र रॉय, जे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री देखील होते, यांची जयंती आणि पुण्यतिथी 1 जुलै रोजी साजरी केली जाते,  वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी देशभरात दरवर्षी 1 जुलैला डॉक्टर्स डे साजरा केला जातो. 1991 मध्ये भारतात प्रथमच राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला, जो तेव्हाच्या तत्कालीन सरकारने सुरू केला होता, तेव्हापासून हा दिवस साजरा करण्याचा ट्रेंड सुरू आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या अमूल्य योगदानाबद्दल आदर व्यक्त करणे हा हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. या निमित्ताने, तुम्ही मराठी संदेश, व्हॉट्सॲप शुभेच्छा, GIF शुभेच्छा, कोट्स, फोटो एसएमएसद्वारे राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.


 


राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा (National Doctor's Day 2024 Wishes)



रुग्णसेवेचे ज्यांनी अखंड व्रत हाती घेतले
असे डॉक्टरांच्या रूपातील देव आम्हास भेटले
राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"



आपल्या आरोग्याची घेतात काळजी घेणाऱ्या
निरोगी आयुष्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या डॉक्टरांना
डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!



रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा
असे माणनाऱ्या सर्व डॉक्टरांना
डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा!"


 


प्रसंगी ज्यांच्यावर हल्ले झाले
तेच कोरोना संकटात आपल्यासाठी पुढे आले
अशा सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार
डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!


 


देवासारखे करतात काम
माणसातल्या देवाला या
सदैव आमचा सलाम
डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा!


 


कोरोनाच्या या कठीण संकटमय काळामध्ये
देवदूत ठरलेल्या सर्व डॉक्टर बंधूंना
डॉक्टर दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!


 


आपल्यावर आलेलं आरोग्यसंकट
देवदूत रूपी होऊन दूर सारणार्‍या
प्रत्येक आरोग्यकर्मीला सलाम
राष्ट्रीय डॉक्टर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


 


मानवतेसाठी केलेल्या सेवेबद्दल धन्यवाद!
आम्ही तुम्हाला सलाम करतो!
आमची इच्छा आहे की तुम्ही             
दीर्घायुष्यी, आरोग्यवान राहावे


 


वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने
काम करणार्‍या प्रत्येकाला धन्यवाद!
डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!



रुग्णांना बरे करणे हा एकच ध्यास
अशा डॉक्टरांसाठी सर्वांनी मिळून
आजचा दिवस करूया खास
राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


 


हेही वाचा>>>


National Doctor's Day 2024 : ...अन् बघता बघता लोकांनी 'त्यांना' देवमाणसाचा दर्जा दिला! 'डॉक्टर्स डे' चा इतिहास काय सांगतो? महत्त्व जाणून घ्या


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )