Mother's Day 2024 : आईला धन्यवाद म्हणण्यासाठी तसा एकच दिवस पुरेसा नाही.. अवघे जीवनही कमी पडेल त्यासाठी.. कारण आईच्या नि:स्वार्थ प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. मातृदिन दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या रविवारी साजरा केला जातो. हा दिवस आईसाठी समर्पित आहे. आईबद्दलचे हे प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो. मदर्स डेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या आईला हृदयस्पर्शी भेटवस्तू देऊ शकता. आईसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी खूप खर्च करण्याची गरज नाही. केवळ 500 रुपयांमध्ये आईसाठी उत्कृष्ट भेटवस्तू तुम्ही देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला काही Best आयडिया सांगत आहोत. 


 


जगातील सर्वात मौल्यवान नातं म्हणजे आई आणि मुलाचं...



जगातील सर्वात मौल्यवान नातं हे आई आणि मुलाचे असते. आई ही केवळ मुलाची आईच नाही तर कुटुंब सांभाळण्याचा आधार आहे. जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते तेव्हा तिचे तिच्या बाळाशी नाते सुरू होते. बाळाला 9 महिने पोटात ठेवल्यानंतर आईचा मुलाशी शारीरिक आणि मानसिक संबंध अधिक घट्ट होत जातो. आईला आशा असते की मूल जेव्हा मोठे होईल तेव्हा तो नेहमी आईच्या जवळ असेल. मात्र, मोठी होणारी मुलं अभ्यास, नोकरी किंवा स्वत:चं कुटुंब तयार करण्यात व्यस्त होतात आणि आईचं बोट धरून चालणं थांबवतात. पण आईवरचं प्रेम तसंच राहतं. जाणून घ्या मदर्स डे निमित्त तुम्ही आईला काय गिफ्ट देऊ शकता..




पर्स


महिलांना पर्स खूप आवडतात आणि त्यांच्यासाठी पर्स खूप उपयुक्त आहेत. अशात तुम्ही तुमच्या आईला पर्स भेट देऊ शकता. बाजारात चांगली पर्स 500 रुपयांपर्यंत मिळतात. ऑनलाइन माध्यमातून स्वस्त दरात पर्सही उपलब्ध होतील. पर्सचे अनेक प्रकार आहेत, जसे की हँडबॅग, टोट पर्स, स्लिंग बॅग, क्लच किंवा मोठ्या आकाराच्या पर्स. आईच्या गरजेनुसार पर्स गिफ्ट करा.




साडी


एक सुंदर साडी आईच्या हृदयाला स्पर्श करेल. तुम्ही त्यांना शिफॉन, ऑर्गेन्झा किंवा जॉर्जेटची सुंदर फ्लोरल प्रिंट आणि बॉर्डर साडी भेट देऊ शकता. तुम्हाला 500 रुपयांच्या आत सुंदर साड्या मिळतील. तुम्ही शॉपिंग वेबसाइटवरूनही साड्या खरेदी करू शकता.




दागिने


मदर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या आईला 500 रुपयांमध्ये सुंदर दागिने किंवा ॲक्सेसरीज भेट देऊ शकता. तुम्ही तुमच्या आईला कानातले, चोकर, नेक चेन, व्यायामाचे दागिने, नेकपीस इत्यादी देऊ शकता. आईलाही हे दागिने आवडतील आणि ती कोणत्याही खास प्रसंगी तुम्ही दिलेले दागिने परिधान करू शकेल.




बांगड्या


बहुतेक बायकांना बांगड्या आवडतात. मदर्स डेला तुम्ही तुमच्या आईला बांगड्याही गिफ्ट करू शकता. त्यांच्या एका साडीशी जुळवून तयार केलेल्या बांगड्यांचा सेट घ्या किंवा बांगड्याच्या बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या ठेवून भेट द्या.


 


हेही वाचा>>>


Travel : 'मदर्स डे' च्या दिवशी आईचा दिवस करा Special! पुण्यातील 'या' 3 ठिकाणांना भेट द्या, भरभरून मिळेल आशीर्वाद


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )