Mother's Day 2024 : मुलांचा वाढदिवस असो.. प्रगतीचा दिवस असो... अपयशाचा दिवस असो.. आई ही आपल्या मुलासोबत सदैव खंबीर उभी असते. आणि त्याला जगाशी लढण्याची हिंमत देते. परिस्थिती कोणतीही असो आई कधीही आपल्या मुलाची साथ सोडत नाही. त्याचप्रमाणे मुलांचंही कर्तव्य बनतं की आपल्या आईला वेळ दिला पाहिजे. तिच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजे, तिला स्पेशल वाटावं असं काहीतरी केलं पाहिजे. पण चिंता करू नका, मदर्स डे म्हणजेच मातृदिन यंदा 12 मे 2024 रोजी आहे. या दिवसाची संधी साधून तुम्ही तिच्यासाठी असं काहीतरी खास करू शकता, की तिच्या चेहऱ्यावरील आनंद तुम्हाला पाहता येईल...


व्यस्त जीवनातातून थोडा वेळ काढा..


ज्या प्रकारे आई  आपल्या मुलांवर प्रेम करते, त्याला जपते आणि संपूर्ण जीवन समर्पित करते. आईच्या या समर्पणाचा सन्मान करण्यासाठी जगभरात मातृदिनाचे आयोजन केले जाते. या व्यस्त जीवनात लोक हळूहळू आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवायला विसरत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, आजकाल मुलांना पालकांसोबत खास वेळ घालवण्यासाठी वेळच उरत नाही. म्हणूनच, या मदर्स डे निमित्त आईला विशेष वाटण्यासाठी तिच्यासोबत वेळ घालवा आणि तिच्याशी भरपूर बोला. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही भारी आयडिया सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या आईसोबत अविस्मरणीय वेळ घालवू शकता.


 


आईला डिनरला घेऊन जा


मदर्स डेच्या निमित्ताने, तुम्ही तुमच्या आईसोबत दीर्घ आणि संस्मरणीय वेळ घालवण्यासाठी त्यांच्यासोबत रात्रीचे जेवण करू शकता. तुमच्या जवळच्या रेस्टॉरंटमधून त्यांचे आवडते पदार्थ मागवा. याशिवाय आईला जेवणाचा मेनूकार्ड द्या आणि तिला तिच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करायला सांगा.



आईसोबत पिकनिक प्लॅन करा


आपल्या व्यस्त जीवनात अनेकदा आपल्याला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळत नाही. आपण असे कधी एकत्र बसलो असतो हे आठवण्याचा प्रयत्न केला तर ते अनेकदा कोणाला माहित नसते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आई आणि कुटुंबासोबत टूर प्लॅन करू शकता. आपल्या आईला आश्चर्यचकित करण्यासाठी, तिची आवडती जागा निवडा.


 


आईला घरातील कामापासून मुक्त ठेवा


आई तिचा सगळा वेळ घरच्या कामात आणि स्वयंपाकात घालवते, त्यामुळे आईला इच्छा असूनही एकत्र वेळ घालवता येत नाही. अशा त मदर्स डेच्या निमित्ताने तुम्ही बाहेरून जेवण मागवू शकता आणि एकत्र बसून खाऊ शकता आणि भरपूर बोलू शकता.


 


आईबरोबर खेळ खेळा


तुमच्या आईला स्पेशल वाटण्यासाठी, तिच्यासोबत एकत्र बसून एक खेळ खेळा. यासाठी आईच्या आवडीचा खेळ ठरवा. याशिवाय तुम्ही आईसोबत संध्याकाळी बाहेर फिरायला जाऊ शकता.


 


 


 


हेही वाचा>>>


Mother's Day 2024 : मुलाच्या हृदयातल्या गोष्टी जाणणारी 'आई'! तिच्याही हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या. या सोप्या टिप्स फॉलो करा


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )