Monsoon Travel : विकेंड आहे खास, बाहेर आहे पाऊस.. मग काय.. मन धावतंय हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेण्यासाठी.. रोजची दगदग.. कामाचा ताण...व्यस्त जीवनातून ब्रेक घेऊन टेन्शन फ्री व्हायचं असेल, तर हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाला प्रवासाची आवड असते. यामुळेच जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला मोकळा वेळ मिळतो तेव्हा तो प्रथम सहलीचे नियोजन करू लागतो. आणि आता पावसाळा म्हटल्यावर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणं हिरवाईने बहरली आहेत. मान्सून असा काळ असतो, जेव्हा बहुतेक लोक प्रवास करण्याचा प्लॅन करतात. तुम्हालाही या ऋतूचा आनंद घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील या ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करा. आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही निसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकतात.



पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं बहरली


पावसाळा सुरू झाल्यामुळे निसर्गप्रेमींसाठी, हा त्यांच्या आवडत्या ऋतूपैकी एक आहे. किंबहुना या ऋतूत काही ठिकाणचे सौंदर्य द्विगुणित होते. या काळात कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर महाराष्ट्राबाहेर जाण्याची गरज नाही, कारण पावसाळ्यात महाराष्ट्रच इतका सुंदर दिसतो, की अनेकजण विविध राज्यातून येथे भेट देण्यासाठी येतात. येथे भेट देण्यासाठी विविध हिल स्टेशन, किल्ले आणि धरण आहे. जे पावसात अगदी हिरवाईने नटले आहेत. जर तुम्ही पावसाळ्यात महाराष्ट्राला भेट देण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या इथल्या काही उत्तम ठिकाणांबद्दल.



महाराष्ट्रातील खास हिल स्टेशन



  • लोणावळा

  • खंडाळा

  • माथेरान

  • लवासा

  • आंबोली

  • इगतपुरी


महाराष्ट्रातील सुंदर घाट



  • ताम्हिणी

  • आंबोली

  • लोणावळा

  • खंडाळा

  • कसारा

  • माळशेज


महाराष्ट्रातील धबधबे



  • देवकुंड धबधबा

  • केपी धबधबा

  • झेनिथ धबधबा

  • काळू धबधबा

  • नाणेघाट धबधबा

  • मढेघाट धबधबा

  • कातळधर धबधबा

  • कुणे धबधबा

  • आंबोली धबधबा

  • नानेमाची धबधबा


महाराष्ट्रातील पाहण्यासारखे किल्ले



  • हरिश्चंद्रगड किल्ला

  • रायगड किल्ला

  • कोरीगड किल्ला

  • राजगड किल्ला

  • जीवधन किल्ला

  • सिंहगड किल्ला

  • विसापूर किल्ला

  • तोरणा किल्ला 

  • तिकोना किल्ला


महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरणे



  • मुळशी

  • खडकवासला धरण

  • पानशेत

  • वैतरणा धरण

  • भंडारदरा धरण


 


 


हेही वाचा>>>


Monsoon Travel : पावसाळ्यात लोणावळ्याला Weekend ट्रिपसाठी जाताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागेल


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )