Monsoon Travel : रोजच कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि तेच धकाधकीचं जीवन... या व्यस्त जीवनातून ब्रेक घ्यावासा वाटतोय ना? ब्रेक घेऊन कुठेतरी शांत ठिकाणी जावंसं वाटतंय ना? तर मग बाहेर कशाला...आपल्या महाराष्ट्रातच अशी काही सुंदर ठिकाणं आहेत, जी सध्या पावसाळ्यात निसर्गसौंदर्यानी बहरली आहेत. पावसाळा म्हटलं की लोणावळा, खंडाळा किंवा महाबळेश्वर हे समीकरण ठरलेलं असतं मात्र आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील लातूर आणि त्याच्या आजूबाजूच्या पर्यटनस्थळांच्या सौंदर्याबद्दल सांगणार आहोत, जे फार कमी लोकांना माहित असावं. लातूरच्या आजूबाजूला अनेक अद्भुत आणि भारी ठिकाणं आहेत, ज्याला तुम्ही वीकेंड डेस्टिनेशन पॉइंट बनवू शकता...


 


लातूरमध्ये अनेक लोकप्रिय आणि ऐतिहासिक ठिकाणं


महाराष्ट्रातील लातूर हे सुंदर आणि प्राचीन शहर मानले जाते. राज्याच्या मराठवाडा भागात असलेले लातूर पूर्वी लत्तलूर आणि रट्टगिरी, रट्टनपुर या नावाने ओळखले जात असे. लातूरबद्दल असे म्हटले जाते की हे एक असे शहर आहे, ज्यावर एकेकाळी राष्ट्रकूट साम्राज्य होते, या राष्ट्रकूट राज्यकर्त्यांनी या शहराचा विकास केला. तसं पाहायला गेलं तर लातूरमध्ये अनेक लोकप्रिय आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत, या ऐतिहासिक शहराच्या आसपास अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे भेट देणे प्रत्येकाचे स्वप्न असू शकते. आज आम्ही तुम्हाला लातूरच्या आसपास असलेल्या अद्भुत ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही पावसाळ्यात कुटुंब, मित्र किंवा वीकेंडला जोडीदारासोबत भेट देऊ शकता.



नागझरी धरण - पर्यटकांना आकर्षित करणारे



लातूरच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही प्रेक्षणीय आणि मनमोहक स्थळाला भेट द्यायला आली की, बरेच लोक प्रथम नागझरी धरणाचे नाव घेतात. हे एक धरण आहे, जे आजूबाजूच्या सौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. नागझरी बंधाऱ्याच्या आजूबाजूची हिरवळ आणि छोटे खडक पर्यटकांना आकर्षित करतात. हे धरण आसपासच्या लोकांसाठी पिकनिक स्पॉट म्हणूनही काम करते. पावसाळ्यात या धरणाचे सौंदर्य पाहण्यासारखे असते आणि पावसाळ्यातच बहुतेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.


अंतर- लातूर ते नागझरी बंधारा हे अंतर सुमारे 12 किमी आहे.


 





बाभळगाव - गावाचे सौंदर्य जवळून पाहा



लातूरच्या आजूबाजूच्या कोणत्याही गावाचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल तर बाभळगाव गाठावे. बाभळगाव हे छोटेसे पण अतिशय सुंदर गाव आहे. बाभळगावचे खरे सौंदर्य म्हणजे येथील हिरवळ. येथे तुम्हाला सर्वत्र हिरवाई दिसेल. विशेष म्हणजे पावसाळ्यात या गावाचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. येथे असलेल्या अनेक आदिवासी समूहांच्या सांस्कृतिक परंपरा जवळून पाहता येतात.


अंतर- लातूर ते बाभळगाव हे अंतर सुमारे 11 किमी आहे.


 




सोलापूर - पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ



महाराष्ट्रातील सोलापूरची माहिती जवळपास सर्वांनाच असेल. सोलापूर हे पर्यटनासाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. सीना नदीच्या काठावर स्थित असल्यामुळे येथे दररोज हजारो लोक भेट देण्यासाठी येतात. निसर्गप्रेमींसाठी हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते.cसोलापूरमध्ये तुम्ही ग्राउंड फोर्ट, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, पारसनाथ मंदिर आणि अधिनाथ मंदिर यासारखी भव्य आणि ऐतिहासिक ठिकाणं पाहू शकता. सोलापूरला भेट देण्यासाठी पावसाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो, कारण पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ दिसते.


अंतर- लातूर ते सोलापूर हे अंतर सुमारे 123 किमी आहे.


 





औरंगाबाद - ऐतिहासिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध 


औरंगाबाद हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील लोकप्रिय पर्यटन स्थळ मानले जाते. हे शहर ऐतिहासिक महत्त्वासोबतच सौंदर्यासाठीही ओळखले जाते. अनेक ऐतिहासिक मंदिरे आणि गुहा येथे आहेत. औरंगाबादमध्ये तुम्ही अजिंठा आणि एलोरा लेणी, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, घृष्णेश्वर मंदिर, पितळखोरा लेणी यांसारख्या अद्भुत ठिकाणांना भेट देऊ शकता. येथे असलेल्या लेण्यांमध्ये इ.स.पूर्व 200 ते 650 या काळातील कलाकृती पाहायला मिळतात.


अंतर- लातूर ते औरंगाबाद हे अंतर सुमारे 264 किमी आहे.




 


हेही वाचा>>>


Monsoon Travel : पावसाळ्यात लोणावळा..खंडाळा तर नेहमीचच...पण गडचिरोलीतील 'ही' अद्भुत ठिकाणं फिरण्याची एक वेगळीच मजा 


 


 


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )