Monsoon Travel : रोजचा कामाचा ताण, इतर जबाबदाऱ्यांमुळे माणसाला दोन क्षण निवांतपणाची गरज असते. त्यासाठी मग या व्यस्त जीवनातून ब्रेक घेत कुटुंबासह किंवा जोडीदारासोबत निवांत क्षण घालवण्यासाठी ट्रीपचे प्लॅन होतात, आता पावसाळा सुरू असल्याने लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, माथेरान अशा ठिकाणी सध्या गर्दी दिसून येतेय. मग जर निवांतपणा आणि निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर महाराष्ट्रात विदर्भातील गडचिरोली हे ठिकाण उत्तम आहे. जर तुम्हालाही येथील सुंदर ठिकाणं एक्सप्लोर करायची असतील तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही अद्भूत आणि सुंदर ठिकाणांबद्दल माहिती देत आहोत.


 


देशी-विदेशी पर्यटकांनाही भुरळ


महाराष्ट्र हे भारतातील एक प्रमुख आणि सुंदर राज्य आहे. या राज्याचे सौंदर्य इतके लोकप्रिय आहे की येथे दर महिन्याला हजारो देशी-विदेशी पर्यटक फिरण्यासाठी तसेच इथले सौंदर्य पाहण्यासाठी येतात. पावसाळा म्हटला की सर्वांच्या तोंडात लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर अशी काही निवडक नावंच असतात. पण तुम्ही कधी महाराष्ट्रातील गडचिरोली येथील पर्यटन स्थळं पाहिली आहेत का? हे एक सुंदर आणि मनमोहक ठिकाण आहे. येथे अशी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत, जिथे भेट देणे प्रत्येकाचे स्वप्न असू शकते.


 


गडचिरोलीतील अद्भुत आणि विलोभनीय ठिकाणं


महाराष्ट्र अनेक अद्भुत आणि उत्कृष्ट पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात लोणावळा, खंडाळा, लवासा, माथेरान, महाबळेश्वर अशा ठिकाणांना भेट देण्याची एक वेगळीच मजा आहे. महाराष्ट्रात वसलेले गडचिरोली हे एक असे शहर आहे जिथे अनेक अद्भुत आणि विलोभनीय ठिकाणे आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला गडचिरोलीतील काही अद्भुत ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासोबत भेट देऊ शकता.





आल्लापल्ली - निसर्गप्रेमींसाठी नंदनवन 


जर तुम्हाला गडचिरोलीतील प्रेक्षणीय आणि सुंदर ठिकाणी जायचे झाल्यास बरेच लोक प्रथम आलापल्लीच्या वनवैभवात पोहोचतात. हे सुंदर ठिकाण वन वैभव आलापल्ली या नावानेही ओळखले जाते. या ठिकाणी अनेक प्रकारची झाडे आणि औषधी वनस्पती पाहायला मिळतील. आलापल्लीचे वैभव त्याच्या हिरवाईसाठी ओळखले जाते. हे ठिकाण एखाद्या उद्यानासारखे विकसित करण्यात आले आहे, या ठिकाणी तुम्हाला नेहमीच थंड वातावरणाचा अनुभव घेता येईल. निसर्गप्रेमींसाठी हे नंदनवन मानले जाते. पावसाळ्यात आलापल्लीचे सौंदर्य शिखरावर असते. या जंगलात पावसाळ्यात सर्वत्र स्थलांतरित पक्षी दिसतात.





वैरागड किल्ला - इतिहास जवळून जाणून घ्यायचाय?



गडचिरोलीचे सौंदर्य पाहण्यासोबतच इथला इतिहासही तितकाच रंजक आहे,  तुम्हाला तो जवळून जाणून घ्यायचा असेल तर वैरागड किल्ला गाठावा. माहितीनुसार, हा भव्य किल्ला 9 व्या शतकात बांधण्यात आला. मात्र, आता या किल्ल्याचा काही भाग अवशेषात बदलला आहे. वैरागड किल्ला डोंगराच्या माथ्यावर वसलेला आहे, त्यामुळे येथे अनेक पर्यटक येत असतात. हा किल्ला खोब्रागढी आणि सतनाळा नद्यांच्या संगमावर वसलेला आहे. गडाच्या उंचीवरून आजूबाजूचे दृश्यही सुंदर दिसते. गडाच्या उंचीवरून संस्मरणीय छायाचित्रणही करता येते.





चपराळा वन्यजीव अभयारण्य - प्राण्यांचे माहेरघर 


चपराळा वन्यजीव अभयारण्य हे केवळ गडचिरोलीचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लोकप्रिय पर्यटन केंद्र मानले जाते. सुमारे 140 चौरस किमी परिसरात पसरलेले हे अभयारण्य दररोज हजारो लोकांना आकर्षित करते. निसर्गप्रेमींसाठी हे नंदनवन मानले जाते. चपराळा वन्यजीव अभयारण्य वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे, त्यामुळे अभयारण्य वर्षभर हिरवेगार दिसते. नदीच्या संगमाच्या काठावर असलेल्या स्थानामुळे या अभयारण्याला प्राण्यांचे माहेरघर असेही म्हणतात. वाघ, बिबट्या, अस्वल, कोल्हा असे अनेक प्राणी येथे पाहायला मिळतात. येथे तुम्ही जंगल सफारी देखील करू शकता.





मार्कंडा मंदिर - मार्कंडेय ऋषींनी बांधलेले मंदिर


गडचिरोली येथे असलेले मार्कंडा मंदिर हे एक पवित्र मंदिर तसेच प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. असे मानले जाते की या मंदिराचे नाव ऋषी मार्कंडेय यांच्या नावावर आहे जे शिवाचे महान भक्त होते. मार्कंडा मंदिराबाबत असे मानले जाते की ते मार्कंडेय ऋषींनी बांधले होते. येथे सापडलेल्या शिलालेखांनुसार, ते 8 व्या ते 10 व्या शतकाच्या दरम्यान बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे, त्यामुळे आजूबाजूचे दृश्यही सुंदर दिसते. मंदिराची वास्तुकला पर्यटकांना खूप आकर्षित करते.


 


हेही वाचा>>>


Monsoon Travel : मुंबई-पुण्यापासून जवळ.. छोट्या पायवाटेने 'या' सुंदर धबधब्याकडे पोहचा, पण काळजी घेऊनच! मोजक्या लोकांनाच माहित...


 


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )