Mobile Habit : बरेचशे लोक सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मोबाईल ( Mobile ) पाहतात. बेडवर पडून मोबाईल पाहण्यात तास, दोन तास कसे निघून जातात तेही कळत नाही. परंतु, सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी मोबाईल पाहण्याची सवय चांगली नाही. आहारतज्ञ लवनीत बत्रा (Lovneet Batra) यांनी आपल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. "आपण सकाळी लवकर मोबाइलच्या संपर्कात येणे टाळले पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर इमेल, इंस्टाग्रामवर स्क्रोल करून तुम्ही आवश्यक थीटा ब्रेन वेव्ह वगळता आणि थेट अधिक तणावपूर्ण बीटा ब्रेनवेव्हकडे जाता, ज्याचा मेंदूच्या संरचनेवर परिणाम होतो, असे बत्रा यांनी सांगितले आहे. 


सकाळी उठल्यानंतर मोबाईल वापरल्याने तुमचा वेळ आणि लक्ष दोन्हीवर परिणाम होतो. ज्यामुळे तुमची काम करण्याची क्षमता कमी होते. सोशल मीडिया किंवा ईमेलद्वारे स्क्रोल करताना मेंदू भरपूर डोपामाइन सोडतो. डोपामाइन एक न्यूरोट्रांसमीटर आहे, जो शरीराच्या आणि मेंदूच्या विविध कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. तुम्ही सकाळी उठल्यानंतर प्रथम मोबाईलचा वापर केल्याने तुमचा सकाळचा दिनक्रम देखील बिघडतो. 


लवनीत बत्रा यांनी सांगितले की, अशा लोकांची संख्या जास्त आहे, जे सकाळी उठतात आणि इतर कामे करण्याऐवजी फोनला चिकटून राहतात. एका संशोधनानुसार, सुमारे 80 टक्के मोबाईल वापरकर्ते सकाळी उठल्यानंतर लगेचच त्यांचा मोबाईल पाहतात. जर तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल आणि तुमचा आनंद वाढवायचा असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात या मार्गांनी करा. 


1. काही वेळ चाला किंवा 10 मिनिटांचे योगासन करा.


2. तुमचा बेड व्यवस्थित लावा  


3. 10-15 मिनिटे नैसर्गिक प्रकाश घ्या.


4. छान नाश्ता तयार करा.


सकाळी उठून मोबाईल वापरल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात. त्याचा तुमच्या मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. त्यामुळेच सकाळी उठून मोबाइल पारण्याऐवजी तुम्ही तुमच्या दिनचर्येत योगा, व्यायाम या सवयींचा समावेश करू शकता. अशा प्रकारे काही चांगल्या गोष्टींची सवय करून घेतली तर तुमची सकाळी मोबाईल पाहण्याची सवय कमी होईल. यामुळे तुमची दिवसाची सुरूवात चांगली होईल. शिवाय तुम्हाला मोबाईलची सवय कमी होईल आणि काही चांगल्या गोष्टींची सवय लागेल, असे आहारतज्ञ लवनीत बत्रा यांनी सांगितलं आहे. त्यामुळं या गोष्टी फॉलो करा आणि आपल्या दिवसाची सुरूवात चांगली करा असा सल्ला तज्ज्ञ देतात. 


महत्वाच्या बातम्या 


Mobile Use : सावधान! टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणं आरोग्यासाठी घातक, 'हे' आहे कारण