Depression Vs Sadness : आजच्या काळात नैराश्य (Depression) हा एक असा शब्द आहे की फर क्वचित लोकांनाच याविषयी माहिती नसेल. अनेकांनी नैराश्य हा शब्द जरी ऐकला असला तरी खऱ्या अर्थाने याचा अर्थ समजणारे फार कमी लोक आहेत. पुष्कळ लोक नैराश्यालाच दु:ख समजतात आणि गोंधळ करतात. खरंतर नैराश्यग्रस्त व्यक्तीला आपण नैराश्यात असल्याचे जाणवू लागते. मात्र, असे होत नाही. दु:ख आणि नैराश्य फार वेगळे आहे. आज आम्ही तुम्हाला दु:ख आणि नैराश्य यामध्ये नेमका फरक काय आहे या संदर्भात सांगणार आहोत. याशिवाय नैराश्य कसे धोकादायक आहे? आणि तुम्ही ते कसे ओळखू शकता हे सुद्धा जाणून घेऊयात. 


दु:ख म्हणजे काय? 


दु:ख ही एक सामान्य मानवी भावना आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधीना कधी ही भावना जाणवतेच. तसेच, दु:ख हे एखाद्या व्यक्तीमध्ये फार काळ टिकून राहत नाही. एखाद्या व्यक्तीला अनेकदा मनाविरूद्ध घडलेल्या घटनेनंतर दु:ख होते. एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होणे, मुलाखत चांगली न जाणे यांसारख्या घटनांमुळे एखाद्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. परंतु, दु:खाची भावना कालांतराने हळूहळू नाहीशी होते. दु:खाचा माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत नाही. तसेच, नैराश्य हे दु:खापेक्षा खूप वेगळे आणि धोकादायक आहे. 


नैराश्य म्हणजे काय? 


नैराश्य हा एक मानसिक विकार आहे ज्यावर वेळीच उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते तेव्हा त्याला सतत दु:खी वाटू लागते. मात्र, नैराश्यात असेलली व्यक्ती इतरांसमोरही स्वत:ला दु:खी दाखवते असे नाही. जर कोणी डिप्रेशनमध्ये असेल तर ती व्यक्ती हसते, लोकांशी बोलते मात्र आतून त्या व्यक्तीला एकटेपणाची पोकळी जाणवते. नैराश्यामध्ये व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागतो. 


नैराश्याची लक्षणे 


जर तुम्हाला अनेक आठवडे सतत कोणत्याही कारणाशिवाय उदास वाटत असेल तर तुम्ही नैराश्याचा बळी ठरू शकता. त्याच वेळी उदासीन व्यक्ती नेहमी वाईट मूडमध्ये आढळते, ती सतत शांत असते, एकटं राहायला आवडतं, काहीही करण्याची इच्छा होत नाही, उत्साही वाटत नाही. तसेच, व्यक्तीच्या झोपण्याच्या पद्धतींमध्ये बदल होतो. काही लोक गरजेपेक्षा जास्त झोपू लागतात. पूर्ण झोप घेतल्यानंतरही त्यांना स्वत:मध्ये ऊर्जा कमी दिसते. तसेच, काही लोक झोप घेत नाहीत. ते संपूर्ण रात्र आणि दिवसभर जागे राहतात. झोपेबरोबरच निराश व्यक्तीच्या आहारावरही परिणाम होऊ लागतो. 


नैराश्याने ग्रस्त व्यक्तीमध्ये ही सर्व लक्षणे दीर्घकाळ टिकून राहतात. जर ही लक्षणे तुमच्यामध्ये 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिली तर तुम्हाला मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. मानसशास्त्रज्ञ वेगवेगशळ्या चाचण्या घेतात आणि एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे की नाही या निष्कर्षापर्यंत पोहोचतात. डिप्रेशनवर वेळीच उपचार न मिळाल्यास, ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय