Makar Sankranti 2024 : नवीन वर्ष 2024 ला सुरुवात झाली आहे. अशातच नवीन वर्षातील पहिला सण म्हणून सर्वजण मकर संक्रांतीची (Makar Sankranti 2024) आतुरतेने वाट पाहत असतात. भारतातील विविधता लक्षात घेता, संक्रांतीचा उत्सव वैविध्यपूर्ण आहे आणि तो विविध प्रकारे साजरा केला जातो यात आश्चर्य नाही. हा सण साजरा करण्यामागे अध्यात्मिक कारणांसह सणाच्या उत्साह आणि चैतन्यामागे सखोल वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कारणेही आहेत.


मकर संक्रांतीचा सण वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या पद्धतीने जरी साजरा करण्याची परंपरा असली तरी यामध्ये एक गोष्ट सामान्य आहे ते म्हणजे तिळाचे (Sesame Seeds) लाडू. संक्रांतीला तिळाचे लाडू बनवण्याची परंपरा आजही कायम आहे. तर, जाणून घेऊयात तिळाचे महत्त्व. 


मकर संक्रांतीत तिळाचे लाडू का केले जातात? 


तिळापासून बनवलेल्या मिठाईचे वाटप करण्यापूर्वी, ते देवाच्या मूर्तीसमोर ठेवले जातात. हे मिठाईमध्ये शक्ती (दैवी ऊर्जा) आणि चैतन्य टिकवून ठेवण्यास मदत करते. पिण्याचे पाणी, अंघोळ, अंगावर तिळाचे तेल लावणे इत्यादी केल्यास पाप नाहीसे होते, असा समज आहे. तिळापासून बनवलेल्या मिठाईचे वाटप करताना आपल्यामध्ये भाव आणि चैतन्य जागृत होते.


वातावरणातील वाढलेल्या चैतन्याचा लाभ घरातील सर्व सदस्यांना मिळतो. लोकांमध्ये प्रेमभाव वाढतो. अशा वेळी मनातील सर्व नकारात्म विचार नाहीसे होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते. आयुर्वेदानुसार हिवाळ्यात तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. अध्यात्मिकदृष्ट्या, तीळ आणि तिळाच्या तेलामध्ये सत्व शोषून घेण्याची आणि उत्सर्जित करण्याची क्षमता इतर कोणत्याही तेलापेक्षा अधिक असते.


तिळाच्या मिठाईचे महत्त्व म्हणजे तिळात जास्त प्रमाणात सत्त्वगुणांचे शोषण आणि उत्सर्जन करण्याची क्षमता असते. तिळाच्या मिठाईचे सेवन केल्याने आंतरिक शुद्धीकरण होते. मिठाई एकमेकांना वाटून सात्त्विकतेची देवाणघेवाण होते, ज्यामुळे प्रत्येकाची सात्त्विकता वाढण्यास मदत होते.


तिळाचे महत्त्व 



  • दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो. याशिवाय केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले असते.

  • ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते.

  • थंडीच्या दिवसात लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाणे चांगले मानले जाते. ज्या महिलांना पाळीत कमी रक्तस्त्राव होतो त्यांनी ही चटणी खाल्ल्यास फायदा होतो.

  • तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे.

  • उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तीळ कमी प्रमाणात खावेत किंवा खाऊच नयेत. ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी संक्रांतीत तीळगुळ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Kitchen Tips : थंडीसाठी पौष्टिक डिंकाचे लाडू! आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी; वाचा साहित्य आणि कृती