Kitchen Tips : हिवाळ्यात (Winter Season) वातावरणात थंडावा असल्यामुळे गरम पदार्थांचं सेवन केलं जातं. जेणेकरून शरीर आतून उबदार राहील. अशातच थंडीत आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे डिंक (Dink). डिंकापासून अनेक पौष्टिक पदार्थ बनवले जातात. डिंक हा आपल्या आरोग्यासाठी (Health) अतिशय फायदेशीर मानला जातो. डिंकामध्ये असलेले पोषकतत्वे आपल्या शरीराला ऊर्जा देतात. त्यामुळे, थंडीच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू आवर्जून खाल्ले जातात. हे डिंकाचे लाडू कसे करायचे याची सोपी रेसिपी या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


डिंकाचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत : 


डिंकाचे लाडू बनविण्यासाठी लागणारं साहित्य : 



  • डिंकाची पूड 2 दिवसांपूर्वी गरम तुपात भिजवून ठेवा. 

  • खारीक पावडर

  • कुटलेले बदाम

  • अक्रोड

  • गूळ पावडर

  • घरी कढवलेलं साजूक तूप

  • 1 वाटी शिंगाड्याचं पीठ

  • भाजलेलं खोबरं.


डिंकाचे लाडू बनविण्याची कृती : 


डिंकाचे लाडू बनविण्यासाठी सर्वात आधी ड्रायफ्रूट्स साजूक तुपात भाजून घ्या. त्यानंतर कढईत खारीक पूड चांगली भाजून घ्या. शिंगाड्याचं पीठ थोडं जास्तच तूप घालून लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्या. आता भिजवून ठेवलेला डिंक गरम कढईत घालून शिंगाड्याच्या पिठात मिक्स करा. हे मिश्रण एकजीव करा. ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. शिंगाड्याचं पीठ आणि डिंक जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत त्याच्यात गूळ मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात ड्रायफ्रूट्स मिक्स करून घ्या. त्यात भाजलेलं खोबरं घाला. खारीक पावडर घाला. वेलदोड्याची पूड. थोडंसं साजूक तूप गरम करून घाला. गूळ आणि तूप अंदाज घेत घेतच घाला. एकदम घालू नका. सर्व मिश्रण तयार झाल्यावर लाडू वळून घ्या. तुमचे डिंकाचे लाडू तयार आहेत. 


डिंकाचे आरोग्यासाठी अगणित फायदे 



  • डिंकामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास मदत होते. 

  • गरोदर महिलांसाठी डिंक फायदेशीर आहे. 

  • हिमोग्लोबीनची कमतरता भरून काढण्यसाठी डिंकाचा वापर केल जातो. 

  • डिंकामुळे पचनसंस्था सुरळीत राहते. 

  • वजन कमी करण्यासाठी डिंक फायदेशीर आहे. 


यासाठीच हिवाळ्यात डिंकाचं सेवन करणं आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. यामुळे शरीर उबदार तर राहतेच पण अनेक आजारांपासूनही सुटका होते. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Winter Health Tips : हिवाळ्यात आजारांपासूनही दूर राहाल आणि रोगप्रतिकारकशक्तीही वाढेल; फक्त 'या' भाज्यांचा आहारात समावेश करा