Travel : हनिमून (Honeymoon Trip In April) अर्थातच मधुचंद्र हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. हा क्षण आठवणींच्या कोपऱ्यात अविस्मरणीय असावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, ज्यांचं नुकतंच लग्न झालंय, किंवा ज्या जोडप्यांना एकमेकांसोबत प्रेमाचे क्षण घालवायचे असतील, अशा लोकांनी जर एप्रिलमध्ये हनीमून ट्रीप प्लॅन केली असेल किंवा करायची असेल त्यांच्यासाठी आम्ही काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुमचा हनीमून अगदी Memorable होईल. जाणून घ्या..


 


भारताबाहेर जाण्याची गरज नाही


हनिमूनसाठी एप्रिलमध्ये फिरण्यासाठी चांगली जागा शोधत असाल तर भारताबाहेर जाण्याची गरज नाही. कारण भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत. जिथे हवामान एकदम रोमॅंटिक आणि आल्हाददायक आहे. इथे तुम्हाला जास्त गरम किंवा जास्त थंडी जाणवणार नाही. जिथे उष्णता जाणवणार नाही, जिथे जोडीदारासोबत निसर्गाचे दृश्य पाहत वेळ घालवता येईल, अशी जागा शोधत असाल तर जाणून घ्या..


 




लक्षद्वीप


तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत परदेशात असल्यासारखा अनुभव हवा असेल. तर तुम्ही लक्षद्वीपला जाऊ शकता. इथले स्वच्छ निळे आकाश, निळे पाणी, सुंदर सूर्यास्त आणि समुद्रकिनारा तुमचा हनीमून आणखी रोमँटिक करेल. उन्हाळ्यात हे बेट थोडे उष्ण असते, त्यामुळे तुम्ही मे-जूनच्या आधी येथे येऊ शकता. जोडप्यांसाठी एप्रिलमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक. एप्रिलमध्ये लक्षद्वीपला भेट देणे सोपे आहे. कारण या वेळी येथे पर्यटकांची गर्दी नसते.


एप्रिलमध्ये लक्षद्वीपचे तापमान : 27 अंश ते 37 अंश
कुठे भेट द्यायची- अगत्ती बेट, बंगाराम एटोल आणि कदमत बेट
कसे पोहोचायचे- लक्षद्वीपला जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोची ते अगाट्टी आणि बंगाराम बेटांसाठी विमानाने जाणे.


 




शिलाँग


एप्रिलमध्ये शिलाँगच्या निसर्ग सौंदर्य बघण्याची जी मजा असते. ती कुठेच नाही. साहस आणि रोमान्स अनुभवण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता. शिलाँग या ठिकाणी एप्रिलमध्ये आकाश निरभ्र असते. इथला ग्रामीण भाग आणखीनच हिरवागार असतो. एप्रिलपर्यंत येथे बर्फवृष्टी थांबते, त्यामुळे येथील हवामान पूर्णपणे स्वच्छ असते. हे ठिकाण एप्रिलमध्ये देखील सर्वोत्तम आहे कारण येथे शद सुक मायन्सीम नावाचा उत्सव साजरा केला जातो. पारंपारिक पोशाखात स्थानिक लोक ढोल आणि बासरीच्या तालावर नाचताना येथे तुम्ही पाहू शकता.


एप्रिलमध्ये शिलाँगमध्ये तापमान : 18 अंश ते 21 अंश


 




 


काश्मीर


असं म्हणतात ना... पृथ्वीवर कुठेही स्वर्ग असेल तर तो फक्त काश्मीरमध्ये आहे. काश्मीर हे रोमँटिक डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. हे पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. हनीमून कपल्सच्या यादीत काश्मीरचे नाव नक्कीच आहे. एप्रिलच्या दरम्यान, तुम्हाला चहुबाजूंनी हिरवेगार घाट गवताळ प्रदेश दिसतील.


एप्रिलमध्ये काश्मीरमधील तापमान : 20 अंश ते 30 अंश


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Travel : मुंबईहून हनिमूनला निघताय? 'हनी' होईल खूश, ट्रीप कराल एन्जॉय! IRCTC चे पॅकेजस पाहिले?