PPF Investment News: अलीकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्व वाढलं आहे. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी लोक विविध योजनांमध्ये (Yojana) मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करत आहेत. अशीच एक गुंतवणूक योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF). ही योजना गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना मानली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्याचे अनेक फायदे आहेत.   


सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे PPF योजनेत गुंतवणूक केल्यामुळं तुमचता पैसा सुरक्षीत राहतो. विशेष म्हणजे यावर चांगला परतावा देखील मिळतो. त्यामुळं यामध्ये केलेली पैशांची गुंतवणूक फायदेशीर ठरते. या योजनेत नागरिकांना चांगले व्याज मिळते.  शिवाय करमुक्त गुंतवणूक देखील होते. मॅच्युरिटीवर मिळणारा पैसा पूर्णपणे चुमचाच असणार आहे. या योजनेचा परिक्व कालावधी 15 वर्षांचा असणार आहे. पण तुम्ही जर या योजनेला मुदतवाढ दिली तर तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो.


श्रीमंत होण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल ?


मुदतपूर्तीनंतर तुमचे पैसे काढा


तुम्ही जर PPF योजनेत गुंतवणूक केली असेल तर योजनेची मुदत संपताच तुम्ही त्यावरील व्याज आणि रक्कम काढा. जर तुमचे खाते बंद झाले तरी सर्व पैसे तुम्हाला मिळतील. दरम्यान, यावर मिळणारे सर्व व्याज हे करमुक्त असणार आहे. तसेच 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर आयकरात सुट मिळते. यातून जमा केलेल्या पैशावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. 


मुदतीनंतरही गुंतवणूक वाढवा


तुम्ही जर विशिष्ट काळासाठी PPF योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला फायदा होतो. मात्र, या खात्याची मुदत संपल्यानंतरही तुम्ही मुदत वाढवू शकता. पाच पाच वर्षांनी जर मुदत वाढवली तर तुम्हाला त्याचा चांगला परतावा मिळतो. तुम्ही मुदत वाढवल्यानंतर कधीही पैसे काढू शकता.  


मुदतपूर्तीनंतरही गुंतवणूक न वाढवताही खाते सुरु राहणार 


दरम्यान, तुम्ही गुंतवणूक केलेल्या योजनेची मुदत संपल्यानंतर एक तर तुम्ही पैसे काढा किंवा मुदतवाढ करा. हे दोन्ही पर्याय केले नाहीत तरीही देखील गुंतवणूक न वाढवताही तुमचे खाते सुरु राहते. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या नवीन गुंतवणुकीची गरज भासत नाही. विशेष म्हणजे तुमच्या जमा झालेल्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळत राहील.


तुम्ही भविष्य निर्वाह निधी योजनेचे खाते कुठेही उगडू शकता. तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्येही खाते उघडू शकता. अल्वयीन व्यकिंना देखील यामध्ये खाते उघडता येते. या योजनेत तुम्हाला 7.1 टक्क्यांचे व्याज मिळते. या व्याजाची वार्षिक गणना केली जाते. तुम्ही जर 15 ते 20 वर्ष गुंतवणूक केली तर तुम्हाला या योजनेचा चांगला फायदा मिळू शकतो. 


महत्वाच्या बातम्या:


SBI मध्ये तुमचं खातं आहे का? 1 एप्रिलपासून बँकेनं केला 'हा' मोठा बदल, खिशाला लागणार कात्री