Spice City of India: नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीचे (Indian Culture) जगभरात चाहते आहेत. विविधतेनं नटलेल्या आपल्या देशाची ख्याती संपूर्ण जगभरात पसरली आहे. भारतीय संस्कृतीसोबतच इथली खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी जगभरातील कानाकोपऱ्यातून लोक आवर्जुन हजेरी लावतात. जगभरातील ट्रॅव्हलर्स, युट्यूबर्स विशेषतः फूड व्लॉगर्स भारतातील पारंपारीक खाद्यपदार्थ चाखण्यासाठी भारतातील विविध शहरांना भेटी देतात. 


भारतीय खाद्यपदार्थांची चव, त्यांचा सुगंध म्हणजे, स्वर्गसुख असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याचं संपूर्ण श्रेय जातं भारतातील मसाल्यांना (Spice City). गेल्या अनेक शतकांपासून मसाल्यांचं माहेरघर म्हणून भारताची ओळख आहे. भारतीय मसाल्यांची बातच न्यारी,त्यांची चव आणि सुगंध सर्वांनाच भूरळ घातलं. याच मसाल्यांमुळे भारताची खाद्यसंस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. 


भारतातही अनेक ठिकाणे आहेत, जिथे मसाले खास आहेत. त्यांच्यामध्ये असंच एक ठिकाण आहे, ज्याला देशातील मसाल्यांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. तुम्हीही विचारात पडला असाल ना? आम्ही दक्षिण भारताबद्दल बोलत आहोत, जिथे जगभरात मसाले निर्यात केले जातात. एवढंच नाहीतर दक्षिण भारताव्यतिरिक्त मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातील काही मसाले जगभर प्रसिद्ध आहेत.


जगातील 109 पैकी 75 मसाले भारतातील 


कदाचित हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आंतरराष्ट्रीय मानक संस्थेच्या यादीत जगभरातील तब्बल 109 मसाल्यांचा समावेश होता. त्यापैकी 75 मसाले हे भारताचं योगदान आहे. यावरुन तुम्ही कल्पना करू शकता की, भारतात किती मसाले तयार होतात आणि इथले 


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आंतरराष्ट्रीय मानक संस्थेच्या यादीत जगभरातील एकूण 109 मसाले ओळखले गेले आहेत, त्यापैकी 75 मसाले हे भारतातीलच आहेत. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की भारतात किती मसाले तयार होतात आणि इथले मसाले जगप्रसिद्ध का आहेत.


मसाल्यांचा राजा 'हे' शहर 


केरळमधलं कोझिकोड मसाल्यांचा राजा म्हणून ओळखलं जातं. या शहरात अनेक मसाल्यांचं उत्पादन घेतलं जातं आणि एवढंच नाहीतर हे मसाले विदेशातही पाठवले जातात. इथे काळी मिरी, तेजपत्ता, वेलची, लवंग, दालचिनी, जायफळ आणि व्हेनिला पॉड यांसारख्या मसाल्यांचं उत्पादन घेतलं जातं. 


आंध्र प्रदेशातील मिरची सर्वात तिखट 


भारतात आंध्र प्रदेश राज्य मिरचीचं सर्वाधिक उत्पादन करतं. इथे अनेक प्रकारची लाल मिरची मिळते, ज्यामध्ये सर्वात तिखट मिरचीपासून कमी तिखट मिरच्यांचंही उत्पादन इथे घेतलं जातं. 


मध्य प्रदेशात सर्वाधिक धन्यांचं उत्पादन 


मसाल्यांच्या पदार्थांमध्ये आवर्जुन समावेश केले जाणारे धनेही फार महत्त्वाचे आहेत. मध्य प्रदेशातील मसालेही जगभरात प्रसिद्ध आहेत. विशेषतः इथे धन्यांचं उत्पादन सर्वाधिक घेतलं जातं. 


मुघल अन् ब्रिटिशांना पडलेली भारतीय मसाल्यांची भूरळ


भारतीय मसाल्यांचा वारसा शतकानुशतकं जुना आहे, म्हणूनच मुघल आणि इंग्रजांनाही भारतीय मसाल्यांचं वेड होतं. असं म्हटलं जातं की, मसाल्यांचं खरं मूळ भारतात होतं आणि इथून लोक परदेशात मसाले घेऊन जात असत.