Tea: चहा जणू आपली एक मूलभूत गरज बनली आहे. आपल्यापैकी अनेकांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग. दिवसाची सुरुवातच आपण चहाने करतो. 12 महिने आपण चहा पितो. मात्र थंडीच्या दिवसांमध्ये चहाची ओढ जरा जास्तच असते. इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात लोक जास्त चहा पितात. भारतात पाण्यानंतर चहा हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक प्यायलं जाणारं पेय आहे. एका झटक्यात आपल्याला फ्रेश करण्याची ताकद ही चहात असते.
आता आपण पाहतो की लोक वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवतात आणि प्रत्येकाची स्वतःची चव वेगळी असते. चहाच्या संदर्भात अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न असतो की चहा किती वेळा उकळावा म्हणजे तो चांगला होईल. आपण कोणता चहा बनवत आहात यावर ते अवलंबून असते. काही लोक विना दुधाचा चहा पितात, काही जण दुधासोबत तर काही ग्रीन टी पितात.
दूध घातल्यानंतर चहा किती वेळा उकळवा
चांगल्या चहासाठी दूध घातल्यानंतर तो 2 ते 3 मिनिटे उकळवा. यापेक्षा जास्त चहा उकळला तर चहाची चव कडू होते. लक्षात ठेवा की जर दूध देखील गरम असेल तर हा वेळ आणखी कमी होईल. म्हणजे चहामध्ये फक्त 1 ते 2 उकळी येऊ द्या.
दुधाशिवाय चहा इतका वेळ उकळवा
जर तुम्ही दुधाशिवाय चहा बनवत असाल तर फक्त 2 ते 3 मिनिटे उकळवा. ग्रीन टीच्या बाबतीतही असेच आहे. ग्रीन टी जास्त वेळ उकळल्यास त्याची चव खराब होते.
चांगला चहा कसा बनवायचा
ब्रिटीश मानक संस्थेने चहा बनवण्याची आदर्श पद्धत दिली आहे जी सर्वोत्तम पद्धत मानली जाते. यासाठी प्रथम एका भांड्यात फक्त दूध गरम करा, दुसऱ्या भांड्यात पाणी ठेवा. पाण्याचे प्रमाण दुधाइतके किंवा थोडे कमी असावे. पाणी गरम झाल्यावर त्यात चहाची पाने किंवा चहा पावडर टाका. चहा पावडरचे प्रमाण साखरेच्या प्रमाणापेक्षा कमी असावे. चहाला चांगली उकळी आली की त्यात साखर घाला. यानंतर चवीनुसार आले, लवंग, काळी मिरी घाला. दूध खूप चांगले उकळवा आणि ढवळत राहा. चहाला चांगली उकळी आली की त्यात उकळलेले दूध घाला. लक्षात ठेवा की दूध घातल्यावर फक्त एक उकळी द्या आणि चहा आपल्याला कपात ओतून घ्या...
ही बातमी देखील वाचा