Aindrila Sharma Death: बंगाली अभिनेत्री अँड्रिला शर्माचं (Aindrila Sharma)निधन झालं आहे. तिनं वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून अँड्रिलाची प्रकृती चिंताजनक होती. काही दिवसांपासून अँड्रिला ही कोमामध्ये होती. ब्रेन स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्याने कोलकाता येथील रुग्णालयात उपचारादरम्यान अँड्रिला शर्मा यांचा मृत्यू झाला. 


अँड्रिलाने कॅन्सरवर मात केली होती. पण 1 नोव्हेंबरला अँड्रिला शर्माला ब्रेन स्ट्रोक आला. यानंतर एंड्रिला शर्माची प्रकृती बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर, 14 नोव्हेंबर रोजी अँड्रिलाला हॉस्पिटलमध्ये मल्टिपल कार्डिॲक अरेस्ट आले, ज्यामुळे अँड्रिलाची तब्येत आणखी खालावली. अँड्रिलानं कोलकातामधील नारायण सुपरस्पेशलिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 


मालिकांमध्ये केलं काम


अँड्रिला शर्माने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तिने 2007 मध्ये 'झूमर' या टीव्ही शोमधून पदार्पण केले.  अँड्रिला सोशल मीडियावरही खूप फॅन-फॉलोइंग आहे,  अँड्रिला शर्माचे इंस्टाग्रामवर अनेक नेटकरी फॉलो करतात. अँड्रिला ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. 'जिओं काठी', 'जीवन ज्योती' यांसारख्या मालिकांमध्ये तिनं काम केलं. तसेच तिनं वेब सीरिजमध्ये देखील काम केलं. तिने भगर या सीरिजमध्ये काम केलं आहे.  






गायक अरिजित सिंह हा अँड्रिला हिला मदत करण्यासाठी पुढे आला होता.  अँड्रिलाच्या उपचाराचा खर्च अरिजित करणार होता, असं म्हटलं जात होतं. अरिजित सिंह हा अभिनेत्रीच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होता. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Arijit Singh: कोमामध्ये गेलेल्या अभिनेत्रीच्या मदतीला धावून आला अरिजित सिंह; सोशल मीडियावर होतंय कौतुक