dry fruit paratha : अनेक लोक एकमेकांना विविध प्रकारचे ड्राय फ्रूट्स गिफ्ट्स देतात. ड्राय फ्रूट्सचे चॉकलेट्स देखील असतात. पण ड्राय फ्रूटचा हेल्दी पराठा तुम्ही कधी खाल्ला आहे का?  चहासोबत नाश्त्यामध्ये अनेकांना पराठा खायला आवडतो. मेथील पराठा, आलू पराठा आणि पनीर पराठा इत्यादी पराठ्याचे प्रकार तुम्हाला माहित असतील. पण ड्राय फ्रूट पराठा हा अनेकांना माहित नाही. हा पराठा तुमच्या आरोग्यासाठी फायदेशिर ठरेल. जाणून घेऊयात ड्राय फ्रूट पराठा तयार करण्याची सोपीपद्धत- 
 
ड्राय फ्रूट पराठा तयार करण्याासाठी लागणारे साहित्य-
गव्हाचे पिठं- 2 कप
तूप-1 चमचा
बारिक कापलेला काजू- 1 चमचा
बारिक कापलेला पिस्ता- 1 चमचा
बारिक कापलेला बदाम-1 चमचा
लाल मिर्ची पावडर- 1 छोटा चमचा 
चिरलेली कोथिंबीर
चविनुसार मिठ


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित


ड्राय फ्रूट पराठा तयार करण्याची सोपी पद्धत-
-एका वाटीमध्ये गव्हाचे पिठ घ्या 
-त्या पिठामध्ये मिठ, तूप आणि पाणी मिक्स करून मळून घ्या. या मळलेल्या कणकेला 10 मिनीटे ठेवा.
-पराठ्याच्या आतील सारण तयार करण्यासाठी एका वाटी सर्व प्रकारचे ड्राय फ्रूट्स घ्या. त्यामध्ये लाल मिर्चीची पावडर आणि कोथिंबीर टाका. हे सर्व तूपामध्ये टाकून गरम करून घ्या. त्यानंतर कणकेमध्ये हे मिश्रण टाकून त्याचे पराठे करा. सोनेरी रंग येईपर्यंत तव्यावर हा पराठा गरम करा. 
-गरम गरम पराठा तयार आहे.


Aditi Rao Hydari : नियमित योगा, डान्स अन् हेल्दी डाएट; अदिती राव हैदरीचा फिटनेस फंडा



 टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत. 


Health Care Tips : सकाळी उठल्यावर पाणी पिणं आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर; काय आहे कारण?


Weight Loss Drink : वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 1 ग्लास काकडीचा ज्यूस


Birthday Special : ग्लॅमरस अदिती राव हैदरीचा नो मेकअप लूक असतो नेहमीच चर्चेत, पाहा फोटो