Health Tips : मधुमेह हा आता सर्वासामान्य आजार झाला आहे. एकदा का जर मधुमेह झाला तर त्यातून सुटका होणे केवळ अशक्य आहे. मात्र, योग्य जीवनशैलीचे पालन करून मधुमेहाला नियंत्रणात ठेवता येते. WHO च्या मते, मधुमेहाची समस्या ही जगातील गंभीर समस्यांपैकी एक आहे आणि अहवालानुसार, रक्तातील साखरेचे रुग्ण भारतात सर्वाधिक आढळून आले आहेत. याला सायलेंट किलर असे नाव देण्यात आले आहे. खरंतर हा आजार वाढला की यावर मार्ग शोधले जातात. पण, जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होते, तेव्हा त्याची काही लक्षणे दिसू लागतात, त्या लक्षणांबद्दल जाणून घेऊयात.
रक्तातील साखरेचे असंतुलन म्हणजे काय?
जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा त्यातून शरीराला ग्लुकोज मिळते, ज्याचा वापर पेशी शरीराला ऊर्जा देण्यासाठी करतात. जर शरीरात इन्सुलिन नसेल तर ते त्याचे काम नीट करू शकत नाही आणि रक्तातून ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे रक्तामध्येच ग्लुकोज जमा होते आणि रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज हानिकारक ठरू शकते. अर्थात या समस्येमध्ये रक्तातील ग्लुकोज सामान्यपेक्षा जास्त होते. जेव्हा स्वादुपिंडाचे कार्य विस्कळीत होते तेव्हा ते इन्सुलिन नावाचे संप्रेरक तयार करू शकत नाही. किंवा फारच कमी करते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे हार्मोन्स आवश्यक असतात. अशा परिस्थितीत, ग्लुकोज रक्तात विरघळू लागते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे असंतुलन होते.
असंतुलित मधुमेहाची लक्षणे
- जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होते, तेव्हा व्यक्तीला चिडचिड आणि थकवा जाणवू लागतो.
- वजनात अचानक बदल होणे हे देखील याचे एक लक्षण आहे. शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर वजन अचानक कमी किंवा वाढू लागते.
- जेव्हा शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते तेव्हा तहान वाढू लागते आणि दिवसभरात अनेक वेळा लघवी करण्याची गरज भासते.
- रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने भूक लागते.
- रक्तातील साखर कमी झाल्यामुळे घाम येणे आणि डोकेदुखीचा त्रास होतो.
- कमी साखरेमुळे, रुग्णाला अचानक छातीत दुखणे किंवा जळजळ जाणवू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :