Mango Chaat Recipe : आंब्याचा सीझन सुरू आहे. आजकाल लोकांना आंब्याच्या सीझनमध्ये विविध प्रकारचे पदार्थ ट्राय करायला आवडतात. अशा परिस्थितीत नियमित आंबा खाण्याऐवजी तुम्ही काहीतरी नवीन पदार्थ तयार करून बघू शकता. आज आम्ही तुम्हाला आंबा चाटची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या डिशची खास गोष्ट म्हणजे ही काही मिनिटांत अगदी सहज बनवता येते.

Continues below advertisement


जर तुम्हाला ही मसालेदार रेसिपी आंब्याच्या सीझनमध्ये तयार करून बघायची असेल. तर तुम्ही ही सोपी पद्धत नक्की वापरू शकता. 


मँगो चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य :



  • 1 पिकलेला आंबा

  • 1 कच्चा आंबा

  • 1 टोमॅटो (बारीक चिरलेला)

  • लाल मिरची पावडर - 1/4 चमचे

  • बारीक चिरलेली कोथिंबीर 1 चमचा 

  • बारीक चिरलेली पुदिन्याची पाने 1 चमचा 

  • जिरे पावडर - 1 /4 चमचे

  • कांदा - 1 (बारीक चिरलेला)

  • लिंबाचा रस - 1 चमचा

  • हिरवी मिरची - 1 (बारीक चिरलेली)

  • हिरवी चटणी - चवीनुसार

  • गोड चटणी - आवश्यकतेनुसार


मॅन्गो चाट बनवण्याची पद्धत : 



  • आंबा चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम पिकलेले आंबे घेऊन त्याची साल काढून घ्या.

  • यानंतर कच्चा आंबाही कापून घ्या.

  • यानंतर कांदे, हिरव्या मिरच्या कापून घ्या.

  • यानंतर एक मोठी वाटी घ्या आणि त्यात पिकलेला आंबा, कच्चा आंबा, कांदा, टोमॅटो घाला.

  • यानंतर त्यात लाल तिखट, जिरेपूड, कोथिंबीर, काळे मीठ आणि पांढरे मीठ टाका.

  • यानंतर सर्व साहित्य नीट मिक्स करा.

  • तुमचा मँगो चाट तयार आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :