Travel : भारतातील हिमालच प्रदेश (Himachal Pradesh) हा एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही असे म्हणतात. कारण याला निसर्गाचं वरदान लाभलंय. हिमाचल प्रदेश पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथील सुंदर दऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात. तुम्हाला माहित आहे का? हिमाचल मध्ये एक सुंदर दरी म्हणजेच ज्याला व्हॅली म्हणतात, तिथलं नैसर्गिक सौंदर्य पाहून तुमचं मनही मोहून गेल्याशिवाय राहणार नाही. किन्नोर व्हॅली हिमाचलमधील सर्वात सुंदर खोऱ्यांपैकी एक आहे. जिथली स्वर्गीय दृश्ये तुम्हाला मोहून टाकतील, इथले नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती आणि अध्यात्मिक वातावरण तुम्हाला भुरळ घालते.
हिमालयाच्या सुंदर टेकड्यांमध्ये वसलेली किन्नौर व्हॅली
हिमाचल प्रदेशातील किन्नौर व्हॅली ही हिमालयाच्या सुंदर टेकड्यांमध्ये वसलेली आहे. किन्नौर हे हिमाचलमधील सर्वात सुंदर खोऱ्यांपैकी एक आहे. जिथे तुम्ही पर्वत, बर्फाच्छादित शिखरे, फळांनी भरलेली झाडे आणि डोंगराळ जंगले पाहू शकता. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनला हजेरी लावल्यानंतर पंजाबी गायक दिलजीत दोसांझही काही दिवसांनी हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. दिलजीतने सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. ज्यात तो किन्नौरच्या संस्कृतीचा आनंद घेताना दिसत होता. तुम्हालाही तिथे जायचे असेल, तर तिथपर्यंत कसे पोहोचायचे आणि कोणकोणत्या ठिकाणांना भेट देता येईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
किन्नौरला जाण्यासाठी कोणता महिना चांगला?
किन्नौरला भेट देण्यासाठी मध्य एप्रिल ते जून हे महिने खूप चांगले मानले जातात. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान तुम्ही किन्नौरला देखील भेट देऊ शकता. किन्नौरला जाण्यासाठी तुम्ही विमानाने शिमला किंवा चंदीगडला जाऊ शकता आणि तिथून बस किंवा कारने घाटीत पोहोचू शकता. किन्नोरमध्ये राहण्यासाठी तुम्हाला अनेक सुविधा मिळतील. येथे तुम्ही होमस्टे, गेस्टहाऊस किंवा लक्झरी हॉटेलमध्ये राहू शकता. पण किन्नौरला जाताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की नॉन-हिमाचल लोकांना इथे जाण्यासाठी इनर लाईन परमिट घ्यावे लागेल.
किन्नौरमध्ये तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता
डोंगराच्या मधोमध वसलेल्या दरीत वाहणारे मंद वारे, छोटी स्वच्छ गावे, धबधबे... तुम्हाला भुरळ घालायला पुरेसे आहेत. या ठिकाणी शांतपणे वाहणाऱ्या सतलज नदीच्या काठावर एकांतात बसणे हे एखाद्या ध्यानापेक्षा कमी नाही.
किन्नौरमध्ये अनेक छोटी गावे आहेत आणि प्रत्येक गाव दुसऱ्यापेक्षा वेगळे आहे. किन्नौरमध्ये तुम्ही कामरू किल्ल्यावर जाऊ शकता जिथे अनेक बौद्ध मठ आहेत.
ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी किन्नौर हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही रुपिन पास मध्ये ट्रेक करू शकता, जो एक अतिशय सुंदर बर्फाच्छादित प्रदेश आहे. तुम्ही इथल्या सफरचंदाच्या बागांमध्ये फिरून निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
किन्नोरची खाद्यसंस्कृती कशी आहे?
किन्नौरमध्ये तुम्ही स्थानिक जेवणाचा आनंद घेऊ शकता. तिबेटचा प्रभाव येथील खाद्यपदार्थांवर दिसून येतो. तुम्ही येथे वाफवलेले बन्स (सिद्दू), नूडल्स सूप (थांग) आणि लँब करी (छा गोश्त) चा आनंद घेऊ शकता. सफरचंद, प्लम, जर्दाळू यांसारखी फळे झाडांवरून तोडून खाण्यास विसरू नका.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Summer Tour : काय झाडी.. काय डोंगर..! भारतातील नगण्य प्रदूषण असणारी 'ही' शहरं माहित आहेत? सौंदर्याला भूरळ पडेल