Karwa Chauth 2022 : करवा चौथचे व्रत 13 ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे. करवा चौथचा (Karwa Chauth 2022) उपवास कार्तिक कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या रक्षणासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी या दिवशी उपवास करतात. विवाहित स्त्रियांव्यतिरिक्त अविवाहित मुलीदेखील (ज्यांचे लग्न निश्चित झाले आहे) या दिवशी निर्जल उपवास करतात. आणि चंद्राकडे पाहून उपवास सोडण्याची प्रथा आहे.  


उत्तर प्रदेशात या व्रताला फार महत्त्व मानले जाते. विवाहित महिला या व्रताची आतुरतेने वाट पाहतात. उपवासाच्या काही दिवस आधीपासून महिला पूजेची तयारी सुरू करतात. हा सण पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहे, त्यामुळे पूजेत कोणतीही कमतरता राहू नये असे प्रत्येक महिलेला वाटणं साहजिक आहे. आणि म्हणून या ठिकाणी करवा चौथ व्रताच्या निमित्ताने पूजेसाठी कोणकोणते साहित्य तुमच्या ताटात असणे आवश्यक आहे. याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.   


करवा चौथचे व्रत कधी आहे? 


यावर्षी करवा चौथचा उपवास 13 ऑक्टोबर 2022 गुरुवारी ठेवण्यात येणार आहे. कार्तिक महिन्याची चतुर्थी 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 01.59 पासून सुरू होईल. चतुर्थी तिथी 14 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 03.08 वाजता समाप्त होईल.


करवा चौथ 2022 चंद्र कधी पाहता येईल?


करवा चौथच्या पूजेची वेळ 13 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 06.01 ते 07.15 पर्यंत आहे. विवाहित स्त्रियांना पूजेसाठी 1 तास 14 मिनिटे मिळतील. शास्त्रानुसार करवा चौथच्या दिवशी चंद्र वृषभ राशीत राहील. यावेळी चंद्रोदयाची वेळ रात्री 08.19 मिनिटांची असेल.


करवा चौथ पूजेसाठी लागणारे साहित्य :


करवा चौथ हा प्रत्येक विवाहितेसाठी महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी पूजेच्या ताटात पान, उपवासाच्या कथेचे पुस्तक, चाळण, कलश, चंदन यांचा समावेश करा. याशिवाय, फुले, हळद, तांदूळ, मिठाई, कच्चे दूध, दही, देशी तूप, मध, साखर पावडर, कुंकू, अक्षता, दिवा, अगरबत्ती, कापूर, गहू, वात (कापूस), खीर यांसारखे साहित्य पूजेसाठी वापरा. तसेच, या दिवशी महिला लाल रंगाची साडी नेसून, बांगड्या, सिंदूर आणि डोक्यावर लाल रंगाची ओढणी असा पूर्ण पेहराव करतात. 


महत्वाच्या बातम्या :