Janmashatmi 2024 Fashion : आज कृष्णजन्माष्टमीचा सण आहे. ठिकाठिकाणी रात्री 12 वाजता कृष्णजन्मोत्सव मोठ्या उत्साहात, धूम धडाक्यात साजरा केला जातो, या निमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. या कार्यक्रमांना जायचं म्हटलं तर पोशाखही तसाच सांस्कृतिक हवा.. म्हणून आज आम्ही तुम्हाला जन्माष्टमीनिमित्त खास राधा-कृष्ण डिझाईन्सच्या साड्यांचे डिझाईन्स सांगणार आहोत. ज्या तुम्ही या कृष्णजन्माच्या वेळी नेसू शकता. या साड्यांकडे पाहून सर्वच कौतुक करतील.


 


राधा-कृष्ण डिझाइनच्या या साड्या जन्माष्टमीसाठी खास,


साडीची फॅशन कधीच ट्रेंडच्या बाहेर जात नाही. यामध्ये तुम्हाला अनेक डिझाईन्समध्ये कलेक्शन पाहायला मिळेल. बदलत्या फॅशनच्या जमान्यात रोज काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे. जन्माष्टमी येणार आहे. या कृष्ण जन्माच्या निमित्ताने आपल्याला पारंपरिक पोशाख घालायला आवडतो. कृष्ण जन्मानिमित्त तुम्ही राधा-कृष्णाच्या डिझाइन्सच्या सुंदर साड्या परिधान करू शकता. या निमित्त पाहूया राधा-कृष्ण साडीच्या नवीन डिझाईन्स. आज आम्ही तुम्हाला हा साडीचा लुक आणखी कसा खुलून दिसेल, याचा सोपा मार्ग सांगणार आहोत


 





बॉर्डर डिझाइन साडी


खूप भारी किंवा फॅन्सी डिझाईन असलेली साडी नेसायची नसेल, तर जन्माष्टमीच्या निमित्ताने बॉर्डर डिझाइनची साडी नेसू शकता. यामध्ये तुम्हाला राधा-कृष्ण रासलीला करतानाचे डिझाइन्स पाहायला मिळतील. आजकाल, मोर आणि भगवान श्रीकृष्णाच्या बासरीची रचना खूप पसंत केली जाऊ लागली आहे.





हस्तनिर्मित साडी डिझाइन


आजकाल, आपल्या सर्वांना साधी साडी विकत घेणे आणि कस्टमाइज्ड डिझाइनसह परिधान करणे आवडते. जर तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही स्वत: साडीवर एम्ब्रॉयडरी करू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास साडीच्या पल्लूवर राधा-कृष्णाच्या प्रेमाचे चित्रण करणारी रचना करू शकता.




हातमाग साडी डिझाइन


पारंपारिक मध्ये सिंपल लूक बद्दल बोलायचे झाले तर हँडलूम साडी सर्वात जास्त पसंत केली जाते. यामध्ये तुम्हाला काळ्या किंवा गडद थीममध्ये अनेक सुंदर डिझाइन्स पाहायला मिळतील. बदलत्या फॅशनच्या जमान्यात तुम्हाला या प्रकारची साडी थोडी महागात मिळू शकते. आपल्याला ते बहुतेक प्रिंटेड डिझाइनमध्ये सापडतील.


 








हेही वाचा>>>


Janmashtami 2024 Food : दुधी बर्फी.. मखाना खीर..जन्माष्टमीला लाडक्या बाळकृष्णाला भरवा प्रेमाने! एकापेक्षा एक नैवेद्याची सोपी रेसिपी पाहाच..


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )