International Music Day 2023 : आंतरराष्ट्रीय संगीत दिन (International Music Day) दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस सर्वात आधी 1975 मध्ये साजरा करण्यात आला. संगीताच्या माध्यमातून जगातील विविध संस्कृतींमध्ये शांतता वाढवणे हा यामागचा आणखी एक उद्देश आहे. संगीत ऐकल्याने आपल्याला एक प्रकारची शांती, आनंद आणि समाधान मिळते. एखाद्या गोष्टीपासून मन विचलित करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अशा दोन्ही प्रकारे संगीताचा वापर केला जातो.


संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ही एक प्रकारची थेरपी आहे. आपल्याला आपल्या मूडनुसार संगीत ऐकायला आवडतं. जसे की, आनंदात असताना आपल्याला सगळी आनंदी, मूड फ्रेश करणारी गाणी ऐकायला आवडतात. मात्र, दु:खात आपल्याला सायलेंट गाणी ऐकायला आवडतात. संगीतामुळे स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलची पातळीही कमी होते. तसेच, अनकदा आपल्याला योग केंद्रात किंवा जीममध्येही व्यायामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी संगीताचा वापर केला जातो. 


वर्कआउट किंवा व्यायाम करताना संगीताची भूमिका खूप खास असते. याचे अनेक फायदेही आहेत. जसे की, गाणी ऐकत असताना व्यायाम केल्याने तुम्ही अधिक सक्रिय आणि उत्साही राहता. तुम्हाला अधिक व्यायाम करावासा वाटतो. याचे असेच अनेक फायदे आहेत ते कोणते हे जाणून घेऊयात.  


थकवा येत नाही


जर तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला दिसेल की संगीत ऐकताना कोणतेही काम करताना थकवा जाणवत नाही. वर्कआउट करतानाही असेच होते. अर्थात थकवा येतो पण तो जाणवत नाही.  


अधिक व्यायाम करू शकता


जिममध्ये व्यायाम करताना मोठ्या आवाजात संगीत का वाजवले जाते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागचा उद्देश असा आहे की, जेव्हा तुम्हाला थकवा जाणवत नाही, तेव्हा तुम्ही थोडी अतिरिक्त कसरत करू शकता. स्टॅमिना वाढवण्यासाठी संगीत खूप उपयुक्त आहे. 


मूड चांगला राहतो


संगीत ऐकताना वर्कआउट केल्याने तुमचा मूड चांगला राहतो. तुम्हाला अधिक सक्रिय आणि उत्साही वाटते. चांगला व्यायाम केल्यानंतर इतर गोष्टी करण्याचा स्टॅमिना राहतो.  यामुळेच जिममध्ये व्यायाम करताना मोठ्या आवाजात गाणी लावली जातात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा