Indians Spending Less Money : भारतीय संस्कृती (Indian Culture), खाद्यसंस्कृती (Indian Food Culture) यांबाबत जगभरात मोठं कुतूहल आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का? आपण भारतीय सर्वाधिक खर्च कशावर करतो? भारतीयांच्या खर्चाबाबत (Indians Spending) एका सर्वेक्षणात मोठा खुलासा झाला आहे. गेल्या 10 वर्षात भारतीयांच्या एकूण घरगुती खर्चात (Household Spent) मोठा बदल झाल्याचं सांगण्यात आलं आहे. सर्वेक्षणानुसार, भारतीयांचा घरगुती खर्च (Household Expenditure of Indians) दुप्पट झाला आहे, तर लोकांचा खाण्या-पिण्यावरील खर्च (Expenditure On Food And Drink) कमी झाला आहे. म्हणजे लोक खाण्यापिण्याऐवजी इतर गोष्टींवर जास्त खर्च करत असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 


कपडे आणि मनोरंजनावर भारतीय करतात सर्वाधिक पैसा खर्च (Indians Spend Most Money on Clothing And Entertainment)


सांख्यिकी मंत्रालयानं (Ministry of Statistics and Programme Implementation) भारतीय कुटुंबांच्या घरगुती खर्चासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या दहा वर्षांत भारतीय कुटुंबांचा घरगुती खर्च दुपटीनं वाढल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. या अहवालात असं समोर आलं आहे की, भारतीय आता त्यांच्या घरातील खाद्यपदार्थांवर कमी खर्च करत आहेत, तर ब्लूमबर्गच्या या अहवालात सरकारी आकडेवारीचा हवाला देत असं म्हटलं आहे की, भारतीय आता कपडे, टेलिव्हिजन सेट आणि मनोरंजनाशी संबंधित वस्तूंवर जास्त खर्च करत आहेत.


शहरं आणि खेड्यांमध्ये खाण्यापिण्यावरील खर्च कमी (Less Expenditure On Food And Drink In Cities And Villages)


सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, समोर आलेल्या माहितीची जर एका दशकाशी तुलना करण्यात आली आहे. यावर जर नजर टाकली तर, ग्रामीण भागातील मासिक खर्चात खाण्यापिण्याचा वाटा 2011-12 च्या तुलनेत 53 टक्के होता, तो आता 46.4 टक्के झाला आहे. शहरी भागांबाबत बोलायचं झालं तर या काळात खर्चातील अन्नाचा वाटा 42.6 टक्क्यांवरुन 39.2 टक्क्यांवर आला आहे. शहरी भागात अन्नाऐवजी अखाद्य पदार्थांचा वाटा 57.4 टक्क्यांवरून 60.6 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर ग्रामीण भागात 47 टक्क्यांवरून 53.6 टक्क्यांवर पोहोचला आहे.


ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 दरम्यान करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. लोकांच्या एकूण खर्चाच्या वाढीबाबत जे चित्र निर्माण झालं आहे, त्यावरुन अंदाज बांधता येईल की, शहरी भागात सरासरी मासिक दरडोई ग्राहक खर्च अंदाजे 6,459 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो 2011-12 मध्ये सुमारे 2,630 रुपये होता. रुपये होते. या कालावधीत, ग्रामीण भागातील आकडा 1,430 रुपयांवरून अंदाजे 3,773 रुपयांपर्यंत वाढला आहे. या पद्धतीने पाहिल्यास गेल्या 11 वर्षांत खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू आणि सेवांवरील मासिक खर्च सरासरी अडीच पटीनं वाढला आहे.


कंज्युमर सर्वेचा वापर नेमका कुठे होतो? 


कौटुंबिक उपभोग खर्च सर्वेक्षणाच्या या आकड्यांवर नजर टाकल्यास हे स्पष्ट होतं की, भारतीयांच्या एकूण खर्चात खाद्यपदार्थांचा वाटा कमी झाला आहे, तर दुसरीकडे प्रवास आणि इतर गोष्टींवरील खर्च वाढला आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, या ग्राहक सर्वेक्षणाला खूप महत्त्व आहे आणि अर्थव्यवस्थेतील मागणीतील चढउतारांचा डेटा सादर केला जातो, हा डेटा सरकार किरकोळ महागाई (Retail Inflation)  आणि GDP मोजण्यासाठी वापरला जातो. रीडजस्ट करण्यासाठी देखील वापरला जातो.