Arunachal Pradesh Politics BJP : अरुणाचल प्रदेशातील चार आमदारांनी भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. यामुळे कॉंग्रेसला (Congress) मोठा झटका बसला आहे. अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे 2 तसेच नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) च्या 2 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसचे आमदार निनोंग एरिंग व वांगलिंन लाऊनदोंग भाजपमध्ये सामील झाल्याचे वृत्त आहे. तर नॅशनल पीपल्स पार्टीचे आमदार मुचू मिथी, गोकर बासर यांनी भाजपात प्रवेश केलाय. यानंतर आता 60 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेस तसेच NPP कडे प्रत्येकी 1-1 आमदार उरलेत.


 


भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे संख्याबळ 56 पर्यंत वाढले


60 सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका एप्रिल किंवा मेमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, चार आमदारांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर, राज्य विधानसभेतील एकूण 60 सदस्यांपैकी, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे संख्याबळ 56 पर्यंत वाढले, तर काँग्रेसचे दोन कमी झाले. सभागृहात दोन अपक्ष सदस्यही आहेत.


 




 



भाजपमध्ये प्रवेश केलेले 4 आमदार कोण?


काँग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग, वांगलिंग लोआंगडोंग आणि एनपीपीचे आमदार मुचू मिठी, गोकर बसर यांनी भगवा पक्षाच्या इटानगर कार्यालयात एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. एनपीपी हा अरुणाचल प्रदेशातील सत्ताधारी भाजपचा मित्रपक्ष आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांशिवाय आसामचे मंत्री आणि भाजपचे अरुणाचल प्रदेशचे निवडणूक प्रभारी अशोक सिंघल आणि प्रदेशाध्यक्ष बिउराम वाहगे हेही उपस्थित होते. 



राज्यात आमचा पाया मजबूत होईल- मुख्यमंत्री पेमा खांडू


चार आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, मुख्यमंत्री पेमा खांडू म्हणाले, "या 4 आमदारांनी पक्षात प्रवेश करणे हे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासाचा पुरावा आहे. पंतप्रधानांचे परिवर्तनवादी नेतृत्व म्हणजे 'सबका साथ,' 'सबका विकास, सबका' 'विश्वास, सबका प्रयास' या ब्रीदवाक्यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्याने देशभरात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या संबंधित मतदारसंघात आणि अरुणाचल प्रदेशात आमचा पाया आणखी मजबूत होईल."