Independence Day 2024 : ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याचा दिवस आपण स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो, हा दिवस भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप खास आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि ते मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरांचे स्मरणही केले जाते, परंतु तुम्हाला माहित आहे का? 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून का निवडला गेला? जाणून घ्या...


 


...त्यानंतर भारत स्वतंत्र देश बनला


15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर भारत स्वतंत्र देश बनला. हा प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे, जो मोठ्या थाटामाटात ध्वजारोहण करून, देशभरात लाडू आणि जलेब्यांचे वाटप करून साजरा केला जातो, परंतु भारताला स्वतंत्र करण्यासाठी 15 ऑगस्ट ही तारीख निवडण्यामागे एक खास कारण आहे. आहे. जाणून घ्या...


 


स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टलाच का साजरा केला जातो?


ब्रिटिश राजवटीनुसार भारताला 30 जून 1948 रोजी स्वातंत्र्य मिळणार होते, पण त्याचवेळी नेहरू आणि जिना यांच्यात भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा सुरू झाला. जिना यांच्या पाकिस्तानच्या मागणीमुळे लोकांमध्ये जातीय संघर्ष होण्याची शक्यता पाहून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्य विधेयक मांडले. या विधेयकाला ब्रिटिश संसदेने तत्काळ मंजुरी दिली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले.



15 ऑगस्ट का निवडला? जपानशी संबंध काय?


15 ऑगस्ट हा दिवस भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्या जीवनातील अतिशय खास दिवस होता. दुसऱ्या महायुद्धात 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी सैन्याने ब्रिटीशांपुढे शरणागती पत्करली होती. त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटीश सैन्यात अलाइड फोर्सेजचे कमांडर होते. जपानी सैन्याच्या आत्मसमर्पणाचे संपूर्ण श्रेय माउंटबॅटन यांना दिले गेले, म्हणून माउंटबॅटनने 15 ऑगस्ट हा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस मानला आणि म्हणूनच त्यांनी 15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून निवडला.


 


यंदा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे की 78 वा?


भारताने 1947 मध्ये पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला, यंदा भारत 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार की 78 वा. जर तुम्ही स्वातंत्र्याच्या तारखेपासून म्हणजे 15 ऑगस्ट 1947 मोजले तर देश स्वतंत्र होऊन 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. यासह, भारत 2024 मध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. 2024 च्या स्वातंत्र्य दिनाची थीम 'विकसित भारत' आहे.