Important days in 20th April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 20 एप्रिलचे दिनविशेष. 


1889 : नाझी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म.


अ‍ॅडॉल्फ हिटलर हे जर्मनी देशाचे  हुकूमशहा होते. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणासाठी आणि ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. ते नाझी जर्मनीचे प्रमुख होते. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरची गणना होते.


1950 : भारतीय राजकारणी नारा चंद्राबाबू नायडू यांचा जन्मदिन


नारा चंद्रबाबू नायडू यांचा जन्म 20 एप्रिल 1950 रोजी झाला. हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देशम पक्षाचे अध्यक्ष आहेत. 


1960 : बासरीवादक पन्नालाल घोष यांची पुण्यतिथी 


पन्नालाल घोष, ज्यांना अमलज्योती घोष म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय बासरीवादक आणि संगीतकार होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील संगीत वाद्य म्हणून बासरी लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांना जाते आणि ते "भारतीय शास्त्रीय बासरीचे प्रणेते" देखील होते.


2004 :  भारतीय पद्मभूषण पुरस्कार सन्मानित शास्त्रीय गायक कोमल कोठारी यांचे निधन.


कोमल कोठारी यांनी लोककलांच्या जतनासाठी उल्लेखनीय योगदान दिले होते. राजस्थानातील लोककला , लोकसंगीत आणि वाद्ये , लुप्त होत चाललेल्या कलांचा शोध इत्यादींसाठी त्यांनी बोरुंडा येथे रुपायण संस्थेची स्थापना केली. 2004 मध्ये त्यांना भारत सरकारने कला क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


2010 : डीपवॉटर होरायझन ऑईलचा स्फोट


डीपवॉटर होरायझन ऑईलचा स्फोट हा 20 एप्रिल 2010 साली झाला. या स्फोटामुळे डीपवॉटर होरायझनमधील 11 कामगारांचा मृत्यू झाला. तर 17 जण जखमी झाले होते. ही जगातील सर्वात मोठी अपघाती सागरी तेल गळती आणि यूएस इतिहासातील सर्वात मोठी पर्यावरणीय आपत्ती मानली जाते.


2011 : इस्रोचे उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV ने तीन उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या पाठवले. 


भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो)  तिसरे ऑपरेशनल प्रक्षेपण PSLV-C3 हे PSLV चे एकूण सहावे मिशन होते. 20 एप्रिल 2011 रोजी इस्रोचे उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV ने तीन उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या स्थापित केले.


महत्वाच्या बातम्या :