Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत.  नुकतेच या कार्यक्रमाचे 500 भाग पूर्ण झाले आहेत. आता हा कार्यक्रम हास्याची पंचमी साजरी करणार आहे. कारण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोमवार, 25 एप्रिलपासून  सोम. ते शुक्र. रात्री 9 वाजता पाच दिवस पाहता येणार आहे. 


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं आहे. समीर, प्रसाद, नम्रता, गौरव, वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे. लॉकडाऊनच्या कठीण काळातही हा कार्यक्रम रसिकांचे मनोरंजन करत होता. आणि आता आठवड्यातले पाच दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. उन्हाळ्याची सुट्टीही  सुरू झाल्याने आता  या धमाल विनोदी कार्यक्रमाचा आस्वाद सहकुटुंब घेता येणार आहे. टेन्शनवरची उत्तम मात्रा असणाऱ्या या कार्यक्रमात हास्याचे अनेक फवारे उडणार आहेत. सध्या प्रत्येक भागात मोठमोठे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर  उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवताहेत.





अल्पावधीत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम आठवड्यातून पाच दिवस रसिकांच्या भेटीस येणार आहे. आता या कार्यक्रमातले कलाकारही आठवड्यातून पाच दिवस प्रेक्षकांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत.


संबंधित बातम्या


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Sher Shivraj : अफजलखानाच्या वधाचा थरार प्रेक्षक अनुभवणार....प्रतापगडाची यशोगाथा 'शेर शिवराज' शुक्रवारी होणार प्रदर्शित


Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट; इंद्रा-दीपूच्या नात्याचं सत्य मालती देशपांडे सरांपासून लपवणार