नंदुरबार: राज्यातील सर्वात मोठी मिरची बाजार समिती आसलेल्या नंदुरबार बाजार समितीत मिरचीच्या भावात पुन्हा तेजी आली आहे. बाजार समितीतील मिरची हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत बाजार समितीने एक लाख 65 क्विंटल मिरची खरेदीचा टप्पा पार केला आहे. लाल मिरचीने 16 हजार रुपयांच्या दराचा टप्पा पार केला आहे.


बाजार समितीत मिरचीची आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली आहे. ओल्या लाल मिरचीला 7 हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर कोरडी लाल मिरचीने 16 हजारांचा टप्पा पार केला आहे. बाजार समितीत अजून एक महिना हंगाम सुरू राहील. यावर्षी बाजार समिती मिरची खरेदीचा दोन लाखांचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे. 


कोरड्या आणि ओल्या लाल मिरचीच्या दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केलं जातं आहे. या वर्षी हळद तेजीत आहे त्याच प्रमाणे लाल मिरचीला चांगला दर मिळत आहे. बाजार समितीत लाल मिरचीची आवक कमी असल्याने तेजी कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


या मिरचीची उशिरापर्यंत तोलाई सुरु असल्याचे दिसून आले. मिरची हंगाम तेजीत आल्याने शेतकरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जिल्ह्यातील विविध भागात लागवड केलेल्या मिरचीची अद्याप तोड सुरू असून यावर्षी आणखी भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोंटुरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरची बाजार पेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. नंदुरबार बाजार समितीच्या आवारात अनेक व्यापारी मिरचीची खरेदी करतात.


महत्त्वाच्या बातम्या: