Black Pepper Use In Winter : काळी मिरी (Black Pepper) हा असा एक मसाल्यातील पदार्थ आहे जो जवळपास प्रत्येक घरात वापरला जातो. काळीमिरीच्या गुणधर्मामुळे आणि चवीमुळे त्याला ब्लॅक गोल्ड असेही म्हणतात. जर तुम्ही हिवाळ्यात काळी मिरीचे सेवन केले तर तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता. यासाठी काळी मिरीचे सेवन कसे करावे हे या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


काळीमिरीचे सेवन कसे करावे?



  • काळी मिरी खाल्ल्याने तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता आणि प्रतिकारशक्ती वाढवू शकता. कारण काळी मिरी अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीव्हायरल गुणधर्मांनी समृद्ध असते. 

  • हार्मोनल असंतुलनाच्या समस्येतून जात असलेल्या महिलांनी सकाळी रिकाम्या पोटी एक काळी मिरी कोमट पाण्याबरोबर खाल्ली तर काही दिवसांतच तुम्हाला बहल जाणवतील.

  • मधुमेहाचे रुग्णही सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरी खाऊ शकतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते.


प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे?


एक काळी मिरी घ्या किंवा चिमूटभर काळी मिरी पावडर घेऊन त्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळा. रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी एक तास आधी हे मिश्रणाचे सेवन करा. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून श्वसनाचे आजार होणार नाहीत.



थंडीच्या दिवसांत खोकला, सर्दी, घसादुखी, ताप आणि आता कोरोना सुद्धा त्रासदायक ठरत आहे. या सर्व समस्यांव उपाय म्हणून दररोज काळी मिरी या पद्धतीने सेवन करणे. हे मिश्रण एकाच वेळी खाण्याऐवजी हळूहळू बोट लावून खाल्ल्यास फायदे मिळतील.


तणाव टाळण्यासाठी काय करावे? 


जर तुम्हाला जास्त ताण येत असेल किंवा तुम्ही मेंदूशी संबंधित इतर कोणत्याही समस्येतून जात असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा देशी गाईच्या तुपात चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळून त्याचे सेवन करू शकता. त्यासोबत तुम्ही गरम दूध किंवा गरम पाणी पिऊ शकता. तणाव कमी करण्याव्यतिरिक्त, ही पद्धत चयापचय वाढवण्यास देखील मदत करते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल