Holi 2024 : नवीन वर्षाची सुरूवात झाली की, आपण विविध सणांची आतुरतेने वाट पाहत असतो,  आपण सर्वजण वर्षभर होळीच्या सणाची वाट पाहत असतो आणि हा सण आला की रंग खेळण्यात कोणतीही कसर सोडत नाही. होळीचा सण कसा साजरा करायचा याचे जेवढे नियोजन आपण करतो, तेवढेच प्लॅनिंग त्वचेच्या काळजीसाठीही करतो. साहजिकच सकाळी रंग खेळायचे असले तरी संध्याकाळी होळीच्या पार्टीलाही जावे लागते. यासाठी त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका पेस्टबद्दल सांगणार आहोत, जी कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी खूप चांगला पर्याय ठरू शकते, तेलकट त्वचा असलेले लोकही ही पेस्ट वापरू शकतात. या पेस्टचा वापर केल्याने त्वचेचा रंग तर निघेलच शिवाय तुमची त्वचा ग्लो होईल आणि डेड स्किनचा थरही निघून जाईल.



होळी स्पेशल उटणं


साहित्य


1 टेबलस्पून तांदळाचे पीठ
1 टीस्पून बेसन
1 चिमूट हळद
1/2 चमचा नारळ तेल
1 चमचा गुलाबजल



पद्धत


एका भांड्यात तांदळाचे पीठ, बेसन, हळद घेऊन त्यात खोबरेल तेल आणि गुलाबपाणी टाका. यानंतर तुम्ही पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला चोळून मळ काढा. मळ साफ केल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. शेवटी, चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.


 


या गोष्टी लक्षात ठेवा


ही पेस्ट फक्त गाल, कपाळ, नाक आणि मानेवर लावा. ही पेस्ट डोळ्यांभोवती लावू नका, कारण डोळ्यांभोवतीची त्वचा नाजूक आहे आणि पेस्ट काढताना तुम्हाला त्रास होऊ शकतो.


जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे असतील तर तुम्ही ही पेस्ट वापरू नये. यामुळे पिंपल्स फुटू शकतात आणि संसर्ग पसरू शकतो. जर तुम्हाला मुरुमे असतील तर तुम्ही केमिकल रहित रंग वापरणे देखील टाळावे.


चेहऱ्यावरील मळ काढताना, आपण आपले हात गालावर हळूहळू लावावे. जर हे उटणं कुठेतरी सुकले असेल तर ते काढण्यासाठी थोडे पाणी वापरावे. 


त्वचेला जास्त वेगाने घासू नका कारण असे केल्याने पुरळ उठू शकते आणि ही स्थिती वेदनादायक असू शकते.


पेस्ट लावल्यानंतर उन्हात बसून कोरडे होऊ देऊ नका. उटणे नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या आणि 30 मिनिटांनंतर उटणे काढून टाकण्याचा प्रयत्न करा. 


बेसन आणि तांदूळ दोन्ही लवकर सुकतात, मात्र नंतर ते काढणे कठीण होते.


 


 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Relationship Tips : रेशीमगाठ जुळत नाही? रिलेशनमध्ये तुमचा जोडीदार आनंदी नाही? हे संकेत वाचा आणि जाणून घ्या