How To Identify Real And Adulterated Mava : होळीचा (Holi 2023) सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या निमित्ताने घरोघरी मिठाई आणि इतर पदार्थ बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. सण जवळ येताच बाजारात विविध प्रकारच्या मिठाई विकत घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. मिठाईची मागणी अचानक वाढल्यामुळे दुकानदार मिठाई बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिठात भेसळ करून दुप्पट नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे दुकानदारांचा नफा होतो तर दुसरीकडे या भेसळयुक्त माव्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर तसेच आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही होळीसाठी मिठाई किंवा मावा खरेदी करत असाल तर तुम्ही भेसळयुक्त मावा ओळखणं गरजेचं आहे. भेसळयुक्त मावा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करू शकतो आणि तुम्ही घरबसल्या ही भेसळ कशी ओळखू शकता ते जाणून घेऊयात. 


भेसळयुक्त माव्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. तुमच्या यकृत, मूत्रपिंड, पोट आणि हृदयावर त्याचा थेट परिणाम होण्याबरोबरच ताप, डोकेदुखी यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.


खरा आणि बनावटी मावा 'असा' ओळखाल?



  • खरा आणि बनावटी मावा दिसायला अगदी सारखाच दिसतो, पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घरी बसूनदेखील यातील फरक ओळखू शकता. खरा मावा ओळखण्याचा पहिला आणि सोपा मार्ग म्हणजे माव्यात थोडी साखर टाकून गरम करा. असं केल्यावर मावा पाणी सोडू लागला तर तो बनावटी मावा आहे असं समजावं.

  • याशिवाय खरा मावा चाखूनही ओळखता येतो. खरंतर, खरा मावा तोंडाला कधीच चिकटत नाही, तर बनावटी मावा तोंडात चिकटतो.

  • खरा मावा चाखल्यावर त्याची चव अगदी कच्च्या दुधासारखी असते.

  • खरा आणि बनावटी मावा ओळखण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे माव्याचा गोळा बनवणे. यासाठी मावा हातात घेऊन त्याचा छोटा गोळा तयार करा. जर मावा तुटायला आणि पसरायला लागला आणि गोळ्याला तडे दिसले तर समजावे की त्यात खराब दुधाची भेसळ झाली आहे.


 या पद्धतींचा वापर करून तुम्ही होळीआधी खरा आणि बनावटी मावा ओळखू शकता. यामुळे चव तर दुप्पट होईलच पण तुम्ही तुमच्या आरोग्याचीही काळजी घेऊ शकाल.


महत्त्वाच्या बातम्या :


Holi 2023 : होळीच्या दिवशी 4 विशेष शुभ योग! पूजा, दान केल्याने मिळेल पुण्य, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या