Chocolate History: जगभरात अशी एकही व्यक्ती शोधून सोपडणार नाही जी चॉकलेट खाल्लं नसेल. अगदी, लहानग्यांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना चॉकलेट खायला आवडते. हे आजपासूनच नव्हे, तर हजारो वर्षांपासून सगळ्या वयोगटातील लोकांना चॉकलेट आवडत होतं. आज जगभरात प्रचंड आवडीनं आणि चवीनं चॉकलेट खाल्लं जातं.  वाढदिवसाला  आणि मित्र-मैत्रिणींना चॉकलेट भेट दिलं जातं. अनेकदा आपण गिफ्ट म्हणून चॉकलेट देतो. परंतु, ज्या चॉकलेटचं नाव घेतल्यामुळे आपल्या चेहऱ्यावार आनंद ओसंडून वाहतो, त्या चॉकलेच्या निर्मितीमागे हजारो वर्षांचा इतिहास (Chocolate History) आहे. हे तुम्हाला माहितीये का? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...


आज आपण जे चॉकलेट आवडीनं खातो त्या चॉकलेटच्या निर्मितीमागे हजारो वर्षाचा आहे. असं सांगितलं जातं की, जवळपास 4 हजार वर्ष जुना चॉकलेटचा इतिहास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चॉकलेटच्या इतिहासाचं मूळ अमेरिकेत सापडतं. जो आजच्या काळातील मेक्सिको देश आहे. या प्रदेशातून जगात पहिल्यांदा कोको वनस्पती आढळून आली. या कोको वनस्पतीपासून सर्वप्रथम चॉकलेट बनवण्याचं श्रेय ओल्मेक्स संस्कृतीच्या लोकांना जातं. लॅटिन अमेरिकेतील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून ओल्मेकला ओळखलं जातं. याचं समुदायातील लोकांनी सर्वप्रथम चॉकलेटचा औषधाच्या स्वरूपात उपयोग केला होता. असा इतिहास आहे.


चॉकलेटचा शोध कुणी लावला?


कोकोच्या वनस्पतीपासून मिळाणाऱ्या फळांपासून चॉकलेट तयार केलं जातं. ही वनस्पती मूळची मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील प्रदेशात आढळून येते. ज्यामध्ये 40 कोको बिया असतात. कोकोच्या बिया बनवण्यासाठी बिया वाळवल्या जातात आणि भाजल्या जातात. एका रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की, ओल्मेक संस्कृतीची लोक एका विधीसाठी पेय तयार करत होते. यासाठी त्यांनी कोकोचा वापर केला होता.


कोकोचा चलन म्हणूनही वापर


पंधराव्या शतकात अझ्टेक संस्कृतीच्या लोकांनी कोकोचा चलन म्हणून वापर केला. चॉकलेटबद्दल असं म्हटलं जातं की, हे क्वेत्झाल्कोटल या देवाने दिलेली पवित्र भेट आहे. पण त्याकाळी चॉकलेटची चव गोड नव्हती, तर सुरुवातीला हे कडू पेय होतं. मात्र, कालांतरानं गोड चॉकलेटची निर्मिती करण्यात येऊ लागली. यानंतर ही गोड चॉकलेट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि प्रचंड प्रसिद्ध झाली.


इतर महत्वाच्या बातम्या वाचा :


Chocolate Day 2023 : नात्यात गोडवा वाढवणारं चॉकलेट आरोग्यासाठी गुणकारी; पाहा फायदे