World Stroke Day 2024: दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक स्ट्रोक दिन साजरा केला जातो. स्ट्रोकला प्रतिबंध करता यावा तसेच या संदर्भात जनजागृती करण्यात यावी हा या दिना मागचा मुख्य उद्देश आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्ट्रोक हे जगभरातील मृत्यू आणि दीर्घकालीन अपंगत्वाचे एक प्रमुख कारण ठरत आहे, ज्यामुळे दरवर्षी लाखो लोकांना जीव गमवावा लागतोय. या निमित्त नवी मुंबईचे मेडिकवर हॉस्पिटल्स येथील वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ जयेंद्र यादव यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. जाणून घेऊया...


स्ट्रोकचे दीर्घकालीन परिणाम कमी करता येऊ शकतात?


जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, वेळीच उपचार केल्याने स्ट्रोकचे दीर्घकालीन परिणाम कमी करता येऊ शकतात. थ्रोम्बोलिसिसमध्ये, विशेषतः, मेंदूच्या प्रभावित भागात रक्त प्रवाह पुनर्संचयित करण्यासाठी क्लॉट-बस्टिंग औषधांचा समावेश असतो. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार स्ट्रोक आल्यानंतर पहिल्या साडेचार तासांत थ्रॉम्बोलायसीस घेतल्यास मेंदूचे नुकसान कमी करता येऊ शकते आणि लवकर बरे होता येते.


स्ट्रोक कसा होतो?


स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्या अरुंद होतात. ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो. (इस्केमिक स्ट्रोक) किंवा रक्तस्रावी स्ट्रोक मेंदूतील ब्लड वेसल लीक होते, तेव्हा हेमोरेजिक स्ट्रोक होतो. अशावेळी तत्काळ वैद्यकीय उपचार करणे महत्वाचे आहे, कारण वेळीच उपचार रुग्णांच्या परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा करू शकतात.


स्ट्रोकची लक्षणं काय?



  • स्ट्रोक म्हणजेच पक्षाघाताच्या प्रमुख लक्षणांमध्ये,

  • तोल जाणे

  • अचानक भुरकट दिसणे

  • एका बाजूचे तोंड वाकडे होणे

  • एक हात निष्क्रिय होणे

  • स्पष्ट बोलता न येणे आदींचा समावेश होत असतो.


BEFAST म्हणजे काय?


सांकेतिक भाषेत या लक्षणांचे वर्गीकरण हे बीफास्ट (BEFAST) असेही करता येते. याचा अर्थ (बॅलेन्स - संतुलन कमी होणे, आईज- दृष्टी धूसर होणे किंवा कमी होणे, फेस- चेहऱ्याचा काही भाग क्षीण होणे, आर्म- हात कमकुवत होणे, स्पीच- बोलण्यात अडचणी आणि टाईम- वेळ)


थ्रोम्बोलिसिसबद्दल कमी जागरूकता 


सामान्य लोकांमध्ये थ्रोम्बोलिसिसची जागरूकता कमी आहे. रुग्ण अनेकदा मदतीसाठी खूप वेळ घेतात, कारण त्यांना लक्षणे किंवा उपचारांचे महत्व माहित नसते, अशा समुदायाला BEFAST लक्षणांबाबत शिक्षित करणे गरजेचे आहे. नागरिकांना स्ट्रोकच्या लक्षणांशी परिचित होण्यासाठी आणि तत्काळ वैद्यकीय सेवा मिळविण्याच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. धोक्याची लक्षणे वेळीच ओळखणे आणि त्यावर कार्य करणे गरजेचे आहे.


 


हेही वाचा>>>


Health: दिवाळीतही प्रतिकारशक्ती राहील मजबूत! फराळ, जंक फूड, मिठाईमुळे आरोग्य बिघडणार नाही! आहारात हे बदल करा


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )