World Rabies Day 2024 : रेबीज हा एक असा जीवघेणा आजार आहे, जो रेबीज विषाणूच्या संसर्गामुळे होतो. ज्यामध्ये व्यक्तीच्या मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊ लागतो. ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यू देखील होतो. साधारणपणे असे मानले जाते की हा आजार श्वानत चावल्याने होतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इतरही असे अनेक प्राणी आहेत जे रेबीज पसरवू शकतात. जागतिक रेबीज दिन 2024 च्या निमित्ताने जाणून घेऊया.
रेबीज दिन का साजरा केला जातो?
रेबीज या गंभीर आजाराशी संबंधित अनेक गोष्टींबाबत लोकांनी अजूनही काही गोष्टी माहित नाहीत. त्यामुळे त्यांना या धोकादायक आजाराबाबत जागरूक करण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो. 28 सप्टेंबर हा दिवस साजरा करण्यासाठी निवडण्यामागे एक खास कारण आहे. खरं तर, रेबीजची पहिली लस तयार करणारे शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे या दिवशी निधन झाले. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो.
रेबीज आजार मानवामध्ये कसा पसरतो?
रेबीज संक्रमित प्राण्यांच्या चाव्याव्दारे किंवा त्यांची लाळ खाल्ल्याने होऊ शकतो. लोकांचा असा विश्वास आहे की रेबीज फक्त श्वान चावल्याने होतो. पण तसे नाही. इतर अनेक प्राणी आहेत, जे हा विषाणू वाहतात आणि ज्यांच्या चाव्याव्दारे तुम्हाला हा आजार होऊ शकतो. त्या प्राण्यांबद्दल जाणून घ्या..
कोणते प्राणी रेबीज पसरवू शकतात?
श्वान - रेबीजची बहुतेक प्रकरणे श्वान चावल्यामुळे होतात. ज्या श्वानांना रेबीजची लस दिली गेली नाही, त्यांच्यापासून धोका जास्त असतो. रेबीज पसरवणाऱ्यांमध्ये विशेषत: भटक्या श्वानांचा समावेश होतो, परंतु पाळीव श्वानाचे लसीकरण केले नसेल, तर त्याच्या चाव्याव्दारेही हा आजार होऊ शकतो.
मांजर- सामान्यतः लोकांना हे माहित नसते, परंतु मांजरी देखील रेबीज पसरवू शकतात. मांजरीच्या चाव्याव्दारेही रेबीज पसरू शकतो.
वटवाघुळ- वटवाघुळ देखील रेबीज विषाणूचे वाहक असतात. त्यांच्या चाव्याव्दारे किंवा स्क्रॅचमुळे रेबीजचा धोका असतो.
रॅकून- रॅकून दिसायला निष्पाप दिसू शकतात, परंतु त्यांच्या चाव्याव्दारे रेबीजचा धोका असतो.
उंदीर- उंदीर देखील रेबीज विषाणूचे वाहक आहेत. त्यामुळे उंदीर चावल्यानेही रेबीज होऊ शकतो.
खार- खार कितीही सुंदर दिसली तरी तिला रेबीजच्या घातक विषाणूची लागण होऊ शकते आणि तिच्या चावल्यामुळे तुम्हाला रेबीजही होऊ शकतो.
ससा - जरी हे अत्यंत दुर्मिळ असले तरी काही प्रकरणांमध्ये ससा चावल्याने देखील रेबीज होऊ शकतो.
माकड- माकड चाव्याव्दारे देखील रेबीज पसरवू शकतो. त्याच्या चाव्याव्दारे किंवा स्क्रॅचमुळे देखील रेबीज होऊ शकतो.
कोल्हा- कोल्हा चावल्याने देखील रेबीजचा संसर्ग होऊ शकतो.
स्कंक- स्कंक हा दुर्गंधीयुक्त प्राणी आहे, ज्याच्या चाव्याव्दारे रेबीज पसरू शकतो.
लांडगा - लांडगा देखील रेबीजचे वाहक आहेत आणि त्यांच्या चाव्याव्दारे रेबीज पसरू शकतात.
रेबीजची लक्षणे कोणती?
रेबीजची लक्षणे दिसायला दोन दिवसांपासून अनेक वर्षे लागू शकतात. रेबीजचा विषाणू मेंदूपर्यंत पोहोचल्यावर ही लक्षणे दिसू लागतात, ज्यानंतर तुमच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर ती परिणाम करतात.
ताप
डोकेदुखी
थकवा
स्नायू दुखणे
घसा खवखवणे
उलट्या
अतिसार
असामान्य वर्तन
आक्रमकता
गोंधळ
पाण्याची भीती
हेही वाचा>>>
Child Health : पालकांनो.. सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवायचंय? तर फक्त हे काम करा, जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )