World Oral Health Day 2023: ज्या प्रकारे पोट, हृदय, डोळे, कान, नाक या आजारांबाबत जनजागृती केली जाते, तशीच आता मौखिक आरोग्याबाबतही जागरूक होण्याची वेळ आली आहे. आजही असे अनेक लोक आहेत जे योग्य प्रकारे तोंड स्वच्छ करत नाहीत, डॉक्टरांकडे जात नाहीत आणि दिवसेंदिवस तोंडाचे आरोग्य बिघडवत असतात. तोंडातून येणार्‍या दुर्गंधीबद्दल लोकांना माहितीही नसते. मौखिक आरोग्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठीच या दिवसाची सुरुवात करण्यात आली. यासच दिवशी संबंधित इतिहास आणि माहिती आपण जाणून घेणार आहोत.


World Oral Health Day 2023: जागतिक मौखिक आरोग्यदिनाचा इतिहास


जागतिक मौखिक आरोग्यदिनाची सुरुवात 20 मार्च 2013 रोजी एफडीआय वर्ल्ड डेंटल फेडरेशनने केली. तेव्हापासून आजपर्यंत हा दिवस (World Oral Health Day 2023) दरवर्षी साजरा केला जातो. यानंतर पुढील वर्षापासून, आंतरराष्ट्रीय दंत विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या सहकार्याने वार्षिक जागतिक एफडीआय स्पर्धा देखील आयोजित केली जात आहे. 


World Oral Health Day 2023: असा साजरा केला जातो हा दिवस


या दिवशी विविध चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये तज्ज्ञ तोंडाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि इतर आजारांशीही त्याचा कसा संबंध आहे, हे स्पष्ट करतात. ठिकठिकाणी दंत तपासणी इत्यादींचे आयोजनही केले जाते. शहरी आणि ग्रामीण भागात लोकांना मौखिक आरोग्याबाबत जागरूक केले जाते. 


मौखिक आरोग्य चांगले नसेल तर अनेक आजार होऊ शकतात. तोंडात असलेल्या अॅसिडमुळे दात किडणे, जंत यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे दातांची इनॅमल पोकळ होऊ लागते आणि त्यामुळेच पोकळी तयार होतात. याशिवाय तोंडात असलेले बॅक्टेरिया दात खराब करू लागतात. वेळीच काळजी न घेतल्यास तोंडाचा कर्करोगही होऊ शकतो.


World Oral Health Day 2023:  तोंडाचे आरोग्य अशा प्रकारे ठेवा निरोगी


1. दिवसातून दोनदा ब्रश करण्याची सवय लावा. सकाळी एकदा आणि झोपण्यापूर्वी एकदा ब्रश करणे आवश्यक आहे. यामुळे दात निरोगी राहतात.


2. घशात कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास किंवा तोंडात काही समस्या असल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून गार्गलिंग करावे.


3. साधारणपणे पोट खराब असलेल्या लोकांची जीभ घाण राहते. जीभ टंग क्लीनरने स्वच्छ करता येते. त्याचा वापर करायला हवा.


4. फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरावी. त्यामुळे दात किडणे टाळण्यास मदत होते.


5. वर्षातून दोनदा दंतवैद्याकडे जावे. त्यामुळे कोणताही आजार होण्याची शक्यता टाळता येते.