Thyroid: आजकाल महिलांना थायरॉईडमुळे अनेक समस्या येताना दिसतात. सतत चिडचिड हाेणे, मासिक पाळी अनियमीत होणं यासह कितीतरी समस्या ओढवतात. पण थायरॉईड नक्की काय आहे? कशामुळे हा आजार वाढतो? हा बरा होऊ शकतो का? जाणून घेऊया..


मानवी शरीर हे अनेक पेशींनी बनलं आहे.यामध्ये ग्रंथींची संख्या मोठी असून घसा दुखणे, तसेच हार्टअटॅक होण्यासह मेंदूवर गंभीर परिणाम होण्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. आपल्या शरिरात घशात असणाऱ्या या ग्रंथींना थायरॉइड म्हणतात. आपल्या शरिरातील स्नायू तसेच हृदय आणि मेंदूचे काम विना अडथळा करण्याचं काम थायरॉईड ग्रंथींचं असतं.  पण या ग्रंथींमधून होणारा संप्रेरकांचा स्राव हा आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त झाला की वजन वाढणं, भूक मंदावणं, शरीर सुस्त होणं तसेच अनेक स्त्रीयांमध्ये मासिक पाळी अनियमीत होण्यासह गर्भधारणेत अडचणी होण्याचं प्रमण वाढतं.


नक्की कशामुळे होते थायरॉईडची समस्या?



  • थायरॉईड समस्येचे प्रामुख्याने तीन प्रकार येतात. त्यातील महत्वाचे म्हणजे हायपोथायरॉइड, हायपर थायरॉइड आणि गलगंड हे होय. परंतू या तीन प्रकारांपैकी  हायपोथायरॉईड आणि हायपर थायरॉईडचा त्रास अधिक होतो. 

  • हायपो थायरॉईड या प्रकरामध्ये थायरॉईड ग्रंथीमधून होणारा संप्रेरकांचा स्राव हा आवश्यकतेपेक्षा कमी होतो. यामुळे वजन वाढणं, भूक मंदावणे यासह मासीक पाळीच्याही समस्या येऊ लागतात. 

  • हायपर थायरॉईड मध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक संप्रेरकांचा स्राव होतो. त्यामुळे आहार जरी संतूलित असला तरी चिडचिडेपणा., स्वभावातील चिंताग्रस्तता वाढून उष्णतेचा त्रास होऊ लागतो. स्वभावात सतत चढउतार व्हायला लागतो. 

  • गलगंड या प्रकारात थायरॉईडच्या ग्रंथींना सूज येते. औषधे घेऊन हा त्रास होऊ शकतो. परंतू समस्या जास्त प्रमाणात समस्या असेल तर मात्र ऑपरेशन करावे लागते. 


या 4 कारणांमुळे होतो थायरॉईड


1. कॅफीनचे अधिक सेवन केल्याने थायरॉईडचा त्रास वाढतो. 


2. महिला वर्गाला प्रसूतीनंतर हा त्रास अधिक वाढतो. 


3. स्वयंप्रतिरोधक रोगामुळे शरीरातील थायरॉईडचे प्रमाण कमी अधिक होते. 


4 दुसऱ्या काही आजारांची औषधे असतील तरीही थायरॉईडचा त्रास वाढू शकतो.



थायरॉईड बरा होऊ शकतो का?


थायरॉईडचा त्रास औषधे घेऊन बरा होऊ शकतो. या औषधांच्या माध्यमातून 80 ते 90 टक्के रुग्ण बरे होतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे थायरॉईडमुळे मृत्यूचे प्रमाण अगदी नगण्य आहे. परंतु थायरॉईडच्या हायपर थायरॉईड या प्रकारामुळे हृदयाचे ठोके कमी होतात. त्यामुळे हार्टअटॅकपर्यंत प्रकरण जाऊ शकते. नियमीत व्यायाम, संतूलित आहार याने तुम्ही थायरॉईडवर नियंत्रण मिळवू शकतो.