Women Health : मासिक पाळी म्हणजे महिलांसाठी निसर्गाचे एक वरदान समजले जाते. ही मासिक पाळी महिलांना साधारणपणे 25 ते 30 दिवसांच्या अंतराने येते. पण काही महिलांना मात्र मासिक पाळी कमी अंतरावर लगेच येते. आणि ही काही सामान्य परिस्थिती नाही. जर मासिक पाळी कमी होत असेल तर ही काही सामान्य बाब नाही. कारण मासिक पाळी मधील अंतर कमी होणं ही चिंतेची बाब आहे. पेल्विक चाचणी किंवा अल्ट्रासाऊंडद्वारे, तुमच्या मासिक पाळीवर काय परिणाम होतंय हे शोधून काढले जाते.
स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात...
महिलांनो.. जर तुम्हाला अनियमित मासिक पाळी येत आहे, किंवा दर 21 दिवसांनी मासिक पाळी येत असल्यास, किंवा रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होत असल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. याशिवाय आठ दिवस रक्तस्त्राव होत असेल, आणि जास्त रक्तस्त्राव होत असेल, चक्कर येत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. आज आपण जाणून घेणार आहोत की मासिक पाळी कमी येण्यामागील कारणे कोणती असू शकतात? ओन्ली हेल्थ वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीपा शर्मा यांनी याविषयी माहिती दिलीय.
मासिक पाळीमधील अंतर कमी झाल्यामुळे..
बदलत्या ओव्हुलेशनमुळे मासिक पाळी देखील विस्कळीत होऊ शकते.
बदलत्या ओव्हुलेशनमुळे मासिक पाळीतील अंतर लहान होऊ शकते.
जर तुम्ही खूप तणावाखाली असाल तर मासिक पाळीवरही परिणाम होतो.
मासिक पाळी ही देखील हार्मोनल प्रक्रिया आहे आणि तणावाचा थेट परिणाम हार्मोन्सवर होतो ज्यामुळे मासिक पाळीचा कालावधी कमी होऊ शकतो.
हार्मोनल असंतुलन, थायरॉईड, पीसीओडी इत्यादींमुळे मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो.
फायब्रॉइड्स आणि गर्भाशयाच्या एडेनोमायोसिसमुळे मासिक पाळीचा कालावधी देखील कमी केला जाऊ शकतो.
गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात सेवन करणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या उद्भवू शकते.
गर्भाशयामुळे देखील मासिक पाळी लहान होऊ शकते.
पेरिमेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीच्या आसपासचा काळ. या काळात मासिक पाळीतही फरक दिसू शकतो.
जीवनशैली सुधारा
आजकालचे धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली या गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाला तरी तुमची मासिक पाळी लहान होऊ शकते. अशा अनेक सवयी आहेत, ज्यांमुळे मासिक पाळी लहान होऊ शकते. जसे की धूम्रपान, तणाव, बदलती जीवनशैली, अतिव्यायाम किंवा अस्वस्थ खाण्यामुळे वजन वाढणे किंवा कमी होणे. या सर्व वाईट सवयींमुळे मासिक पाळी लहान होऊ शकते. मासिक पाळी सामान्य करण्यासाठी, प्रथम आपली जीवनशैली सुधारा.
हेही वाचा>>>
Women Health : शरीरात अत्यंत शांतपणे पसरतो 'हा' कर्करोग! महिलांनो.. चुकूनही 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )