Good Health Care Tips : थंडी हळूहळू वाढत चालली आहे. हिवाळा सुरू होताच खोकला, सर्दी, ताप, घसा खवखवणे यासारख्या समस्यांचा सामना करावा  लागतो. हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात काय खावे आणि काय टाळावे हे बहुतेकांना माहीत नसते. 


हिवाळ्यात काय खावे - 
कोणत्याही ऋतूत येणार्‍या हंगामी भाज्या आणि फळे खाणे महत्त्वाचे असते. हिवाळ्यात गाजर, वाटाणे, पालक, सलगम, रताळे, बीट्स, कोबी अशा भाज्या खायला हव्यात. तर संत्री, पेरू, सफरचंद, द्राक्षे, किवी अशी फळे खायला हवीत. जर तुम्ही उन्हात बसून या फळांचे सेवन केले तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. 


हिवाळ्यात गरम पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. हिवाळ्यात अंडी खाणे फायदेशीर असते. अंड्यांमध्ये प्रोटीन आणि जीवनसत्त्वांचा समावेश असतो. त्यासोबत आले, गूळ, लवंग, वेलची, दालचिनी अशा मसाल्यांचादेखील आहारात समावेश केला पाहिजे. ड्रायफ्रुट्स लाडूचादेखील आहारात समावेश असायला हवा. हिवाळ्यात चहा प्यायला सर्वांनाच आवडते. हिवाळ्यात चहामध्ये तुळस आणि आले घालावे. मसाला चहादेखील फायदेशीर असतो. 


व्यायाम करणे खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे हिवाळ्यात 30 मिनिटे व्यायाम करायला हवा. हिवाळ्यात व्यायाम केल्याने अनेक आजारांपासून सुटका होते. हिवाळ्यात थंड पदार्थ खाऊ नयेत. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाऊ नये. या ऋतूत थंड दूध, दही भात किंवा थंड अन्न खाऊ नका, ताजे अन्न खा.


हिवाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स


स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी, तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. तुम्ही रोज अक्रोड, बदाम इत्यादी ड्रायफ्रुट्सचे सेवन केले पाहिजे. यासोबतच फळे आणि भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. जीवनसत्त्वे अ, क, ब आणि फायबर असलेली फळे आणि भाज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीरातील मेटाबोलिजम सुरळीत ठेवण्यास मदत करतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या


Skin Care In Winter: हिवाळ्यात त्वचेची घ्या अशी काळजी; ट्राय करा या सोप्या टिप्स


Omicron Coronaviras : ओमायक्रॉनचा धोका वाढतोय; जाणून घ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे उपाय


Health Tips: हिवाळ्यात पोटदुखीचा त्रास होतोय? करा हे घरगुती उपाय


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha