Check Your Immunity : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा धोका सध्या वाढत आहे. ओमायक्रॉनसारखी लक्षणे दिसणारी अनेक प्रकरणे भारतात दिसून आली आहेत. त्यामुळेच पुन्हा एकदा लोकांमध्ये कोरोना व्हायरसबाबत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांवर कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम होत आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचे डॉक्टर आणि शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.


ज्या लोकांची प्रतिकारशक्ती चांगली असते ते लवकर आजारी पडत नाहीत. आपली रोगप्रतिकारक शक्ती ही पांढऱ्या रक्त पेशी, प्रतिपिंडे आणि इतर अनेक घटकांनी बनलेली असते. अशा परिस्थितीत ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, ते लवकर आजारी पडतात. 


रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आहे की कमकुवत आहे हे कसे ओळखावे?
- तुम्हाला जर सर्दी, खोकला लवकर होत असेल आणि तुम्ही आजारी पडत असाल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे. 
- ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, त्यांना हवामान बदलताच काही समस्यांचा त्रास होतो.
- याशिवाय काही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर लगेचच तुम्हाला संसर्ग झाला तर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे.


कमकुवत रोगप्रतिकार शक्ती कशी ओळखावी?
1. डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे
2. सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने न वाटणे
3. कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देणे
4. वारंवार पोटाचा त्रास होणे
5. स्वभावाने चिडखोर असणे
6. लवकर आजारी पडणे
7. लवकर थकवा येणे


प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय खावे?
- रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संत्री, किवी, आंबा, पेरू आणि लिंबू यांसारखी व्हिटॅमिन सी असणारी फळे खायला हवीत. 
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दही खायला हवे. 
- प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ब्रोकोली खायला हवीत. ब्रोकोलीमध्ये अँटीऑक्सिडंट असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- किवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या


Health Care Tips : 'हे' पदार्थ तुमची हाडे निरोगी ठेवतील, करा आहारात समावेश


Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार


Good Health Care Tips : सावधान! जेवणानंतर तुम्ही 'या' चुका तर करत नाहीत ना?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha