Skin Care In Winter: हिवाळ्यामध्ये (Winter Season)  त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा हे  त्वचेचे तीन प्रकार आहेत. थंडीमध्ये जर तुम्ही केमिकल्स असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला रॅश येणे (Skin Rashes) आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या जाणवतील. त्यामुळे थंडीमध्ये त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी तुम्हाला हे  डेली रुटीन फॉलो करावे लागेल-  


सकाळी त्वचेची घ्या अशी काळजी 
रोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने धुवा. चेहरा धुताना फेसवॉशचा वापर करा. चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. थंड पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी केल्याने त्वचा कोरडी पडते. 
 
रात्री झोपण्या आधी चेहरा धुवा 
रोज रात्री झोपण्याधी चेहरा धुवा. चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर  हायड्रेटिंग सीरम लावा. हे सीरम चेहऱ्याला लावून मालिश करा. यामुळे चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडत नाही आणि मुलायम राहते. 
 
फेस  पॅकचा वापर करा 
घरी तयार केलेल्या फेस पॅकचा वापर करा.  मुलतानी  माती गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला फेस पॅक म्हणून लावू शकता. तसेच मसूर डाळीचा पॅक देखील तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. मसूर डाळीचा पॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम दोन चमचे मसूर डाळीचे पिठ घ्या आणि त्यामध्ये एक चमचा दही आणि गुलाब पाणी मिसळा. या पॅकला मिक्स करा. त्यानंतर तयार झालेले हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या


Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार


skin Care Tips : चेहऱ्यावरील पिम्पल्स होतील दूर; 'हे' टोनर ठरेल फायदेशीर, जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत


Health Care Tips : 'हे' पदार्थ तुमची हाडे निरोगी ठेवतील, करा आहारात समावेश