Winter Care: हिवाळ्याची सुरुवात झाली आहे आणि दिवस लहान होत आहे. अनेक जण उबदार स्वेटर वापरू लागले आहेत आणि गरम पेये प्यावीशी वाटत आहेत. हिवाळ्यात हवा थंड आणि कोरडी होते. त्यामुळे त्वचेत बदल होतो. हिवाळा ऋतू हा स्कीन टाइटनिंगच्या उपचारांसाठी आदर्श कालावधी असतो. प्रोफेशनल उपचार असो किंवा घरगुती उपाचर, त्वचेची काळजी अधिक परिणामकारक होण्यासाठी हिवाळ्यात विशेष फायदे मिळतात. मुंबईतील स्कीन, हेअर, लेझर क्लिनीकच्या तज्ज्ञ डॉ. सिद्धी चव्हाण यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय.


त्वचेतील तेल संतुलित करा.


हिवाळ्यात हवा थंड आणि कोरडी होते. त्यामुळे त्वचेत बदल होतो. कमी आर्द्रतेमुळे त्वचेवरील तेल कमी होते. परिणामी, त्वचा कमी तेलकट आणि उपचारांसाठी अधिक अनुकूल होते. नैसर्गिक तेल कमी झाल्याने अडथळा कमी होतो आणि उत्पादने त्वचेत खोलवर झिरपू शकतात आणि अधिक प्रभावी ठरतात. घट्टपणा आणणारे सिरम किंवा क्रीम वापरल्यास उत्तम परिणाम साध्य होऊ शकतात, कारण तेल कमी असल्याने ती त्वचेत खोलवर शोषली जातात.


स्कीन टाइटनिंग उपचारांचा विचार करताय?


तुम्ही व्हायोरा, मायक्रो नीडलिंग किंवा केमिकल पील्ससारख्या तीव्र स्वरुपाच्या स्कीन टाइटनिंग उपचारांचा विचार करत असाल हिवाळा हा त्यासाठी एक उत्तम ऋतू आहे. हिवाळ्यात अतिनील किरणांशी तुमचा होणारा संपर्क अत्यल्प असतो. अतिनील किरणांचा तुमच्या नुकत्याच उपचार केलेल्या त्वचेवर परिणाम होतो. ऊन कमी असल्याने हायपरपिगमेंटेशनची जोखीम कमी होते. म्हणजे अपायकारक किरणांमुळे येणाऱ्या अतिरिक्त तणावाचा परिणाम होऊ न देता तुमची त्वचा बरी होते. ज्या उपचारांसाठी विश्रांतीची गरज असते अशा उपचारांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. या कालावधीत, सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या हानीची चिंता न करता त्वचा पुन्हा ताजीतवानी होऊ शकते.


त्वचेची निगा राखण्यासाठी ही सुवर्णसंधी


हिवाळ्यात बराच वेळ आपण घरात असतो. त्यामुळे तुमच्या त्वचेची निगा राखण्यासाठी ही सुवर्णसंधी असते. या कालावधीत आपण खऱ्या अर्थाने आपले लाड करू शकतो आणि घरच्या उबदार वातावरणात मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग करू शकतो. चेहऱ्याची काळजी घेणे, मास्कचा वापर करणे, सेरम लावणे या सगळ्या गोष्टी आपण घरात असल्यावर करणे सहज शक्य होते. स्वतःची काळजी घेणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते. स्कीन टाइटनिंग करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानासोबत ही काळजी घेतल्यास चांगले परिणाम साध्य होतात. कोअर (CORE - Channeling Optimized RF Energy) तंत्रज्ञान बाय-पोलर मल्टी-रेडिओफ्रिक्वेन्सीसह उत्कृष्ट कामगिरी करते. यामुळे त्वचा घट्ट होण्यास आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त, हिवाळ्याच्या काहीशा संथ महिन्यांमध्ये अनेकांना त्वचेची निगा राखण्यासाठी एक दिनचर्या तयार करणे व त्यावर अंमलबजावणी करणे शक्य होते. त्यामुळे दीर्घकालीन परिणाम साध्य होतात.


हायड्रेशन आणि पोषण


हिवाळ्याचा त्वचेवर परिणाम होऊ शकतो. ती कोरडी होऊ शकते आणि चुरचुरू शकते. अशा वेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी दर्जेदार मॉइश्चरायझरचा तुमच्या स्कीनकेअर दिनचर्येत समावेश करावा. ह्यालुरोनिक ॲसिड, ग्लिसरीन व पेप्टाइड असलेल्या उत्पादनांमुळे हायड्रेशन मिळते आणि त्वचेची तन्यता वाढते. जेव्हा तुमची त्वचा चांगल्या प्रकारे हायड्रेटेड असते तेव्हा ती अधिक सुदृढ असते आणि टाइटनिंग उपचारांना अधिक चांगला प्रतिसाद देते. त्याचप्रमाणे अँटिऑक्सिडंट्स व जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असलेली हंगामी फळे खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते आणि तुमच्या स्कीन-टाइटनिंग लक्ष्याला अंतर्बाह्य मदत होते.


मानसिक स्वास्थ्य


ऋतूमध्ये होणाऱ्या बदलामुळे तुमच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होत असतो. हिवाळ्यातील काळोख्या, थंड महिन्यांमध्ये उदास वाटते किंवा ऊर्जेची कमतरता जाणवते. या काळात स्वतःची, विशेषतः त्वचेची काळजी घेतल्यास तुमचा मूड चांगला राहतो आणि आत्मविश्वास वाढतो. तुमच्या त्वचेबद्दल तुम्हाला छान वाटत असेल तर तुमचा संपर्क वाढतो आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्येही मनोबल उंचावते.


त्वचा ताजीतवानी करण्यासाठी हा आदर्श कालावधी


वसंत ऋतू आणि उन्हाळ्यासाठी तुमची त्वचा तयार करण्यासाठी हिवाळा हा आदर्श कालावधी असतो. या कालावधीत स्कीन टाइटनिंगचे उपचार घेतले तर जेव्हा उन्हाळ्याचे महिने सुरू होतील तेव्हा तुमची त्वचा सुदृढ आणि उत्तम असेल. व्हायोरासारख्या उपचारांमुळे या दिवसांमध्ये पेशंट्समध्ये उत्तम परिणाम साध्य झालेले आहेत. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे सुरू केल्यामुळे नवीन त्वचा तयार होण्यासाठी आणि ताजीतवानी होण्यासाठी वेळ मिळतो. यामुळे त्वचा जास्त सूर्यप्रकाशाला सामोरे जाण्यापूर्वी तयार होते.


त्वचेचे पोषण करा


हिवाळा हा अनेकांसाठी शीतनीद्रेचा काळा असला तरी स्कीन टाइनिंग आणि त्वचा ताजीतवानी करण्यासाठी ही एक उत्तम संधी असते. वातावरणात झालेला बदल आणि घरात राहण्याचा कालावधी वाढणे यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी करण्याच्या उपचारांवर गुंतवणूक करण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. या कालावधीत तुमच्या त्वचेचे पोषण केल्याने तुमची त्वचा उजळ होईल आणि येऊ घातलेल्या दिवसांसाठी तुमची त्वचा सज्ज होईल. म्हणून, तापमान कमी झाल्यावर तुमच्या त्वचेकडे लक्ष देण्यास विसरू नका. आता त्वचेकडे लक्ष दिले तर तुम्हाला सुंदर, सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.


हेही वाचा>>>


Relationship : 'माझा मुलगा एका विवाहित महिलेसोबत राहतोय, लिव्ह इन रिलेशनशिपबाबत प्रेमानंद महाराजांनी भक्ताला सांगितली 'अंदर की बात!'


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )