मुंबई : झोप (Sleep) ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वसामान्यपणे आठ तासांची झोप घेणं ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट असते. त्याचप्रमाणे गाढ झोप (Deep Sleep) घेणं देखील तितकचं महत्त्वाचं असतं. गाढ झोप घेतल्याने आपला मेंदू योग्य कार्य करण्यास सक्षम होते. तसेच आजूबाजूच्या वातावरणाशी शरीराला जुळवून घेण्यास गाढ झोप घेणं आवश्यक असतं. पण आता प्रश्न असा निर्माण होतो की गाढ झोप म्हणजे नेमकं काय? आपण झोप तर दररोज घेतो पण गाढ झोपेचा नेमका संबंध काय हे जाणून घेणं देखील तितकचं महत्त्वाचं असतं. 


गाढ झोप म्हणजे नक्की काय?


झोपेचे एकूण तीन प्रकार असतात. त्यातील गाढ झोप हा झोपेचा तिसरा प्रकार आहे. गाढ झोपेला स्लो-वेव्ह स्लीप असं देखील म्हणतात. गाढ झोपेच्या वेळी मेंदूमधील क्रिया ही संथ गतीने होत असते. या प्रक्रियेला डेल्हा लहरी असं म्हणतात. या लहरी गाढ झोपेच्या वेळी या लहरींची गतीही संथ होते. साधारणपणे झोपेच्या एक तास आधी गाढ झोपेचा कालावधी सुरु होते. तर जसजशी रात्र सरते तसतसं गाढ झोपेचा कालावधी हा संपत जातो. 


गाढ झोपेच्या वेळी हृदय आणि श्वासोच्छवास यांसारख्या क्रिया देखील संथ गतीने होत असतात. त्यामुळे या कालावधीमध्ये स्नायू देखील शिथील झालेले असतात. म्हणूनच गाढ झोपलेल्या व्यक्तीला जागं करणं हे खूप कठीण काम असतं.  


झोपेचे नेमके प्रकार आणि टप्पे कोणते?


झोपेचे एकूण तीन प्रकार आणि चार टप्पे असतात. नॉन रॅपिड आय मूव्हमेंट (NREM) या प्रकारांमधून आपण वन रॅपिड आय मूव्हमेंट (REM) या प्रकारामध्ये जातो. त्यानंतर गाढ झोप हा तिसरा प्रकार असतो. हा कालावधी सर्वसाधरणपणे 90 ते 120 मिनिटांचा असतो. या तीन प्रकारांमध्ये एकूण चार टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात तुमचा श्वास आणि हृदयाचे ठोके कमी होतात. तुमच्या झोपेच्या निम्मी झोप ही दुसऱ्या टप्प्यात होते. यामध्ये तुमच्या श्वासांची आणि हृदयाची गती आणखी कमी होते. तिसरा टप्प्यामध्ये तुम्ही गाढ झोपेमध्ये असता. चौथा टप्पा हा आरईएम असा असतो. आपल्याला पडणारी बहुतेक स्वप्न ही या टप्प्यामध्ये पडतात असं तज्ज्ञांचं मत आहे. 


गाढ झोप का महत्त्वाची असते? 


मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी गाढ झोप आवश्यक असते. स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यासाठी गाढ झोप आवश्यक असते. गाढ झोपेमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. या व्यतिरिक्त पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि चांगली ठेवण्यासाठी गाढ झोप आवश्यक आहे.