Wet Hair in Winter : थंडीच्या दिवसात (Cold Weather) ओले केस (Wet Hair) घेऊन घराबाहेर पडून नये असा सल्ला आपल्याला अनेक जण देतात. हिवाळ्यात ओले केस घराबाहेर पडल्यास आजारी पडण्याचा धोका असतो, असा दावाही केला जातो. पण यामागचं सत्य काय आहे, हे जाणून घ्या. थंडीच्या दिवसात जास्त वेळ केस ओले ठेवल्याचा शरीरावर काय परिणाम होतो, हे जाणून घ्या.


हिवाळ्यात ओले केस घेऊन घराबाहेर पडताय? 


हिवाळ्यात केस ठेऊन घराबाहेर पडल्याने आपण आजारी पडण्याची शक्यता आहे, हे खरं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. सर्दी, व्हायरल फ्लू आणि श्वसनाचे आजार विषाणूंमुळे होतात. काही सायनस संक्रमण बॅक्टेरियामुळे होतात. हे जंतू सामान्यतः आजारी लोकांच्या शिंकणे, दूषित अन्न खाणे किंवा पिणे, दूषित पृष्ठभागास स्पर्श करणे आणि नंतर त्यांच्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श केल्याने पसरतात. ओल्या केसांवर जंतू जास्त काळ टिकून राहू शकतात, त्यामुळे यामुळे आजार पसरण्याचा धोका टाळता येत नाही.


आजारपणाचा धोका वाढतो?


अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या संसर्गजन्य रोग समितीचे अध्यक्ष सीन ओलेरी यांनी सांगितलं की, "फक्त थंडीत बाहेर गेल्या तुम्हाला सर्दी होऊ शकते असं नाही. मी ओल्या केसांसह थंड हवामानात बाहेर जाण्यास अजिबात संकोच करत नाही, पण जंतू संसर्ग टाळण्यासाठी मी सर्व काळजी घेतो."


नेमकं सत्य काय?


हिवाळ्यामध्ये वातावरण दम असल्यामुळे आपल्या शरीराच्या बाहेर आणि आतमध्ये जंतू वाढण्यासाठी एक चांगले वातावरण तयार होते. काही संशोधनात असे दिसून आले आहे की, थंड वातावरणात इन्फ्लूएंझा विषाणू चांगल्या प्रकारे वाढण्याची संधी मिळते. थंड वातावरणाचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो, ज्यामुळे आपल्याला जंतूंचा संसर्ग लवकर होऊ लागतो. परिणाम लोक हिवाळ्यात जास्त आजारी पडतात.


तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात ओले केस घेऊन बाहेर जाण्याने तुम्ही बॅक्टेरिया (Bacteria) किंवा विषाणूंच्या (Virus) संपर्कात आल्याशिवाय आजारी पडत नाही. हिवाळ्याच्या ऋतूमुळे जंतूंशी लढण्याची आपली क्षमता कमी होते. रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे थंड हवामानाचा त्रास होतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Salad Tips : सॅलड खाताना केलेली 'ही' चूक पडेल महागात! पचनसंस्थेवर वाईट परिणाम