Sweets Craving After Meal : जेवल्यानंतर (Meal) अनेकांना मिठाई (Sweets) खाण्याची इच्छा असते. एवढंच काय तर लग्न किंवा पार्टीमध्ये गेल्यावर मिठाईचा स्टॉल सर्वात शेवटी का असतो? याचा तुम्ही विचार केला आहे का? हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर वेटर्सही तुम्हाला शेवटी स्वीट्स काय खाणार असं विचारतात? हे का घडतं याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? जेवल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा असणे, अगदी सामान्य गोष्ट आहे. पण यामागील विज्ञान फार कमी लोकांना माहिती आहे. जेवणानंतर मिठाई खाण्यामागचं खरे शास्त्रीय कारण जाणून घ्या.


जीभेवरील पेशी संतुलित करण्यासाठी


चविष्ट जेवणानंतर जिभेवरील स्वाद पेशी संतुलित करण्यासाठी मिठाई खाण्याची इच्छा निर्माण होते. याशिवाय कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स युक्त अन्न खाल्ल्याने सुस्ती जाणवते, अशावेळी गोड पदार्थ खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. त्यामुळे स्वीट क्रेविंग्स होते.


रक्तातील साखरेचं संतुलन


जेव्हा एखादी व्यक्ती ब्रेड (Bread), पास्ता (Pasta) किंवा भात (Rice) यासारखे कार्बोहायड्रेट (Carbohydrates) खातो, तेव्हा शरीर त्यांचे ग्लुकोजमध्ये (Glucose) विघटन करते आणि आपले शरीर इन्सुलिन (Insulin) तयार करते. अशा परिस्थितीत जेव्हा आपण जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट खातो, तेव्हा आपले शरीर आवश्यकतेपेक्षा जास्त इंसुलिन तयार करू शकते, ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने घसरते. अशा वेळी, रक्तातील साखर कमी झाल्यामुळे, गोड खाण्याची लालसा वाढते ज्यामुळे रक्तातील साखर सामान्य होते.


हार्मोन्सचा परिणाम


जेवणानंतर स्वीट खाण्याची इच्छा होणे, हा शरीरातील हार्मोन्सचाही परिणाम आहे. मिठाई खाल्ल्याने मन प्रसन्न होते. जेव्हा आपण काही गोड खातो, तेव्हा आपला मेंदू (Brain) डोपामाइन (Dopanine) नावाचे रसायन सोडतो ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. आपल्या मेंदूला आनंद मिळविण्यासाठी मिठाई खाण्याची इच्छा निर्माण होते.


मिठाईऐवजी तुम्ही 'या' गोष्टी खाऊ शकता


मिठाई खाल्ल्याने अनेक शारीरिक नुकसान होऊ शकते. लठ्ठपणा किंवा मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी जास्त गोड खाणं टाळणं आवश्यक आहे. त्यामुळे जास्त साखर असलेल्या मिठाईऐवजी तुम्ही फळे, मनुका यासारख्या गोष्टी खाऊ शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Health Tips : शरीरात सूज येण्याला तुमच्या 'या' वाईट सवयी कारणीभूत! गंभीर आजाराचं लक्षण; आजच बदल करा नाहीतर...