Weight Loss: आजकाल वाढता कामाचा ताण आणि झपाट्याने बदलणारी जीवनशैली यामुळे लोक लठ्ठपणाचे बळी ठरत आहेत. अशा स्थितीत वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे डाएट फॉलो करतात. जसे की केटो आणि अधूनमधून फास्टिंग, वैगेरे वैगेरे.... प्रत्येकाचे स्वतःचे फायदे आहेत. पण तुम्ही कधी DASH Diet बद्दल ऐकले आहे का? हा यापैकी एक डाएट आहे, जो तुम्हाला गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतो. जर याबद्दल नसेल माहित तर आजच त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या.


हा DASH डाएट काय आहे?


आजकाल लोक स्वतःला फिट ठेवण्यासाठी विविध उपाय करतात. वजन कमी करण्यासाठी विविध डाएट फॉलो करण्याबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल, परंतु तुम्हाला कदाचित माहित नसेल की आहाराचे पालन करणे वजन तसेच इतर आरोग्य समस्यांपासून मुक्त होण्यास प्रभावी असा एक डाएट आहे. ज्याबद्दल तुम्ही कदाचित ऐकले असेल,  DASH Diet म्हणजे उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी ही एक उत्तम डाएट प्लॅन समजला जातो, जो उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फॉलो केला जातो. हा डाएट उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी, हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर मानली जाते. अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमधील संशोधनात असेही समोर आले आहे की, DASH डाएटमुळे केवळ उच्च रक्तदाबाचा धोका कमी होत नाही, तर 75 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये हृदयविकार किंवा अटॅकचा धोका देखील कमी होतो.


DASH डाएट कोणासाठी फायदेशीर आहे?


रक्तदाब असंतुलनामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी हा डाएट फायदेशीर आहे. हायपरटेन्शनमध्ये हा डाएट फॉलो केल्याने आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होते. DASH डाएट फॉलो करणे हृदयविकारांमध्ये देखील फायदेशीर ठरू शकते. DASH डाएट घेतल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते. या आहारामुळे रक्तातील लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (एलडीएल) किंवा खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे एचडीएल किंवा चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते. हा डाएट मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. DASH डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील साखर हळूहळू बाहेर पडते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. टाईप-2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरू शकते.


DASH आहारात काय खाल्ले जाते?



  • कॉर्न, ओटचे पीठ, संपूर्ण गव्हाची चपाती, ब्राऊन राईस, धान्य आणि त्यांची उत्पादने वापरली जातात.

  • ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने अँटिऑक्सिडंट्स मिळतात.

  • तुम्ही कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ जसे की कमी चरबीयुक्त दूध, दही आणि चीज खाऊ शकता.

  • काजू आणि बियांच्या सेवनाने पोटॅशियमचे प्रमाण वाढते.

  • कमी सोडियम मसाले निवडा. ऑलिव्ह किंवा एवोकॅडो तेलात जेवण शिजवा. 


हेही वाचा>>>


Health: अजबच.. Red Wine प्यायल्याने कर्करोगाचा धोका होतो कमी? काय आहे सत्य? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )